मी मेंदूचा डॉक्टर, माझ्याकडे येतील त्यांचा मेंदू उघडून…काय म्हणाले डॉ.सुजय विखे-पाटील

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी नगर लोकसभा मतदार संघातून पराभव केला आहे.

मी मेंदूचा डॉक्टर, माझ्याकडे येतील त्यांचा मेंदू उघडून...काय म्हणाले डॉ.सुजय विखे-पाटील
sujay vikhe patil
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 4:17 PM

शिर्डी परिसरात येत्या दोन वर्षात गोर गरिबांसाठी विखे परिवार 200 बेडचे हॉस्पिटल उभारणार असल्याचे भाजपाचे माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी सुजय विखे पाटील यांच्या भाषणामुळे मोठा हास्यकल्लोळ उडाला. ते यावेळी म्हणाले की आता मी खासदार नाही. त्यामुळे मोकळाच आहे, मात्र मी तसा मेंदूचा डॉक्टर आहे. तिथे दवाखाना उघडल्यानंतर जे माझ्याकडे येतील, मी त्यांचा मेंदु एकदा उघडुन पाहील, की नेमका हा कोणाचा आहे आणि त्याच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळेल अस मिश्किल भाष्य डॉ.सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली आणि एकच हास्यकल्लोळ उडाला.

ते पुढे म्हणाले की मला अनेकदा फोन येतात की, आता साईबाबा हॉस्पिटलमध्ये आमचे पेशंट घेतले जात नाहीत. साईबाबा हॉस्पिटलमध्ये गरीबाला बेड मिळत नाही. मात्र रात्री गेलेल्या श्रीमंतांसाठी एका फोनवर बेड उपलब्ध होतो. यातुन मार्ग काढण्यासाठी विखे पाटील परिवाराने निर्णय घेतलाय की पुढील दोन वर्षात शिर्डीत 200 बेडचे हॉस्पिटल उभारणार असेही सुजय यांनी यावेळी सांगितले.हे मोफत 200 बेडचे रुग्णालय सुरु झाल्यानंतर गोरगरीबांना उपचार मिळतील नाशिकला जाण्याची काही गरज राहणार नसल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

पवार आणि विखे-पाटील वैर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी नगर लोकसभा मतदार संघातून पराभव केला आहे. सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. ते न्युरोसर्जन आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तसंच विखे-पाटील फाऊंडेशनचे ते प्रमुख आहेत. साल 2019 मध्ये ते भाजपात आले. शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबातील वैर बाळासाहेब विखे-पाटील यांच्या काळापासूनचे खुप जुने असल्याचे म्हटले जाते. राधाकृष्ण विखे पाटील देखील आता भाजपात असून महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. नगर लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांनी निलेश लंके यांना उमेदवारी देऊन सुजय विखे पाटील पराभूत होतील याची व्यवस्था केली होती. आणि त्यानुसारच ते पराभूत झाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.