Earthquake : लडाखला भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात सलग तीनदी लडाख ला भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आता पुन्हा येथे भूंकप झाला आहे. लडाखच्या कारगिलमध्ये (Kargil) तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पुन्हा एकदा भूकंपामुळे कारगिल हादरले. येथे यावेळी 4.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी दुपारी 2.35 च्या सुमारास हा भूकंप […]
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात सलग तीनदी लडाख ला भूकंपाचे (Earthquake) धक्के बसल्यानंतर आता पुन्हा येथे भूंकप झाला आहे. लडाखच्या कारगिलमध्ये (Kargil) तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी पुन्हा एकदा भूकंपामुळे कारगिल हादरले. येथे यावेळी 4.2 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता जास्त नसली तरी दुपारी 2.35 च्या सुमारास हा भूकंप झाल्याचे कळत आहे. तर या भूकंपामुळे येथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त आलेले नाही. यापूर्वी लडाखमध्येही (Ladakh) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. 6 एप्रिलला लडाखमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. हे धक्के कारगिलच्या उत्तरेस 328 किमी अंतरावर जाणवले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड भागात आज पुन्हा 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. जो मध्यरात्री 12.59 वाजता झाला होता.
कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के
त्यानंतर 22 एप्रिललाही लडाखच्या कारगिलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने माहिती दिली होती की, संध्याकाळी 6.50 च्या सुमारास येथे भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 मोजली गेली.
5 फेब्रुवारीला बसले होते उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके
दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके 5 फेब्रुवारी 2022 ला जाणवले होते. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदूकुश येथे होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक भयभीत झाले. भूकंपामुळे तब्बल 15 ते 20 सेकंद जमीन हलली. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने भेदरलेल्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन तात्काळ घरातून पलायन केले. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही तात्काळ घराबाहेर काढण्यात आलं. अचानक धरणी हल्ल्याने अनेक लोक घाबरलेले दिसत होते. भूकंपाचे धक्के बसल्यानंतरही अनेक लोक भीतीपोटी बराच वेळ घराबाहेरच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले.
An earthquake of magnitude 4.2 occurred at around 2:53pm, 195km NNE of Kargil, Ladakh today: National Center for Seismology pic.twitter.com/ImY8mPM2cK
— ANI (@ANI) April 24, 2022