Marathi News Latest news A female calf elephant falls down an open well rescued after a 16 hour long rescue operation
16 तास विहिरीत तगमग, हत्ती अखेर बाहेर
विहीर बरीच खोल असल्याने या हत्तीणीला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर हत्तीणीच्या सुटकेसाठी वनखात्याला पाचारण करण्यात आले. | elephant rescue operation
Follow us
तामिळनाडूच्या पांचपली गावात गुरुवारी एक हत्तीण विहिरीत पडल्याची घटना घडला होती.
विहीर बरीच खोल असल्याने या हत्तीणीला बाहेर कसे काढायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर हत्तीणीच्या सुटकेसाठी वनखात्याला पाचारण करण्यात आले.
हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वनखात्याकडे आवश्यक सामुग्री नव्हती. त्यामुळे वनखात्याने अग्निशामन दलाला मदतीसाठी बोलावले.
तब्बल 16 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या हत्तीणाला विहिरीतून सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले.
अग्निशमन दलाने क्रेनच्या साहाय्याने या हत्तीणीला विहिरीतून अलगद उचलून बाहेर काढले.
सुटकेचा हा थरार पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हत्तीणीला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला.