पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरात घरफोड्या करणारी मध्यप्रदेशातील चोरांची टोळी गजाआड

सांगलीसह, सातारा, कोल्हापूर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरात घरफोड्या करणारी मध्यप्रदेशातील चोरांची टोळी गजाआड
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 6:03 PM

सांगली : सांगलीसह, सातारा, कोल्हापूर, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण परिसरात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने पकडले आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वीच इस्लामपूर येथे तब्बल तीन घरफोड्या केल्या होत्या. तसेच सांगलीतील अहिल्यानगर येथेदेखील घरफोडी केली होती. त्यांच्याकडून पाटण येथील 3, इस्लामपूर येथील 3 आणि सांगलीतील दोन घरफोड्या आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (Gang of thieves from Madhya Pradesh arrested, who carried out Robberies in Pune, Sangli, Satara and Kolhapur)

मध्य प्रदेशातील काकडवाल येथील केरम उर्फ केरमसिंग रमेश मेहडा (30), भगोली येथील उदयसिंग रेमसिंग मेहडा (23), काकडवाल येथील गुड्या उर्फ गुडिया ठाकूर मेहडा (20) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्यारे, मिरचीपूड, चांदीच्या वस्तू आणि घड्याळ असा 23 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्याकडून राज्यातील अनेक ठिकाणी केलेल्या घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच या टोळीतील जगदीश मानसिंग सिंगाड हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या टोळीचा प्रमुख केरमसिंग मेहडा हा दोन वर्षांपूर्वी इस्लामपुरातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यामध्ये बगॅस विभागात काम करत होता. त्यावेळी त्याने या परिसराची संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांच्या साथीने घरफोड्या सुरु केल्या असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा

लग्नाच्या चार दिवसांनी नवरी म्हणाली, मी तर पोळ्या लाटण्यासाठी आले होते; जबरदस्तीने लग्न लावलं!

भिगवणच्या भरवस्तीत अवैध वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून तरुणीसह महिलेची सुटका

घोडबंदर रोडला 19 लाखांच्या दागिन्यांची चोरी, चोरटे मध्यप्रदेशात फरार, ठाणे पोलिसांचा अहोरोत्र तपास, अखेर सोने हस्तगत

(Gang of thieves from Madhya Pradesh arrested, who carried out Robberies in Pune, Sangli, Satara and Kolhapur)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.