जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं, दोन पायलट शहीद
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं मिग हे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बडगाम या जिल्ह्यात कोसळल्याचं बोललं जातंय. या दुर्घटनेत वायूसेनेचे दोन पायलट शहीद झाले आहेत. या विमानांमध्ये एक ते दोनच पायलट असतात. यामध्ये जास्त जवान नसतात, अशी माहिती आहे. सीमेवर सध्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानली जात […]
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं मिग हे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बडगाम या जिल्ह्यात कोसळल्याचं बोललं जातंय. या दुर्घटनेत वायूसेनेचे दोन पायलट शहीद झाले आहेत. या विमानांमध्ये एक ते दोनच पायलट असतात. यामध्ये जास्त जवान नसतात, अशी माहिती आहे. सीमेवर सध्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानली जात आहे.
पुलवामा हल्ला आणि भारताची पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक यानंतर एलओसीवर संवेदनशील परिस्थिती आहे. त्यामुळे वायूसेनेच्या अनेक विमानांकडून सीमेवर गस्त घातली जात आहे. अनेक विमाने सध्या सीमेवर गस्त घालत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या मिग विमानाला अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत माहिती मिळू शकली नाही.
विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. यानंतर स्थानिकांनी विमानाकडे धाव घेतली. कोसळल्यानंतर विमानाला आग लागली. स्थानिकांकडून आणि तिथे असलेल्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काश्मीरमध्ये सध्या युद्धाचं सावट आहे. परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. वायूसेनेकडून हवेत गस्त घातली जात आहे.
एलओसीवर पाकिस्तानच्या जवानांकडून सातत्याने गोळीबार केला जातोय. तर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या पाच चौक्या उडवल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाल्याचीही मोठी बातमी आहे. क्षणाक्षणाला सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार होतोय. काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती झाली आहे.
व्हिडीओ पाहा :