मुख्यमंत्र्यांच्या सभेत बॅनरबाजी, पोलिसांच्या मदतीला ‘संकटमोचक’ धावले
वर्ध्यातील मुख्यमंत्र्यांच्या (CM devendra fadnavis) सभेत एका व्यक्तीने बॅनर फडकावण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं. हा झालेला गोंधळ मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन व्यासपीठ सोडून खाली आले आणि त्यांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM devendra fadnavis) यांची महाजनादेश यात्रा सुरु आहे. या यात्रेतील वर्ध्यातील मुख्यमंत्र्यांच्या (CM devendra fadnavis) सभेत एका व्यक्तीने बॅनर फडकावण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं. हा झालेला गोंधळ मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक गिरीश महाजन व्यासपीठ सोडून खाली आले आणि त्यांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला.
संबंधित व्यक्तीने सरपंचाविरोधात बॅनर फडकावलं. प्रशांत झाडे याने फलक फडकावले. कैलास काकडे या बाजार समितीचा व्यापारी आणि सरपंच याने बाजार समितीत आर्थिक घोळ केला असल्याचा प्रशांत झाडे यांचा आरोप आहे. त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत हे बॅनर फडकावण्यात आले.
यानंतर प्रशांत झाडे यांची पोलिसांनी धरपकड केली. मंत्री गिरीश महाजन यांना सभा व्यासपीठवरून खाली यावं लागले आणि सुरु असलेला गोंधळ मिटवावा लागला.