बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. | Ira khan

बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 11:13 PM

मुंबई: बॉलीवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा हिने आपल्यावर बालपणी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. तिने आपल्या यूट्यूब अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते, असे इराने व्हिडीओत म्हटले आहे. (I was sexually abused says Aamir Khan daughter Ira)

काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावेळी तिने आपण डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून इरा खान चर्चेत आहे. दरम्यान, इराने शेअर केलेल्या नव्या व्हीडिओत तिने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मी डिप्रेशनमध्ये जावे, असे काहीच माझ्या आयुष्यात घडले नव्हते. मात्र, तरीही मला नैराश्य आले.

अनेकजण मला याबाबत विचारतात, पण मी त्याचे कारण सांगू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी स्वत: याचे कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. आयुष्यात मला कधी पैशांची कमी भासली नाही. माझ्याकडे एक सपोर्ट सिस्टीम आहे. माझे आई-वडील, मित्रमैत्रिणींनी कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यावर दबाव आणला नाही. माझ्या आयुष्यात काहीही घडले तर ते मी माझ्या आई-वडिलांना सांगू शकते, असे इराने या व्हिडीओत म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर हिंदी डबिंग करुनही अपलोड केला आहे. संबंधित बातम्या:

त्या’ व्हिडीओवरून ट्रोल; आमिरची कन्या नेटकऱ्यांवर भडकली

अभिनेता आमिर खानवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप, भाजप आमदाराकडून पोलीस तक्रार

Fatima Sana Shaikh | 3 वर्षांची असताना ‘शोषणा’ची बळी ठरले, ‘दंगल गर्ल’चा खळबळजनक गौप्यस्फोट

(I was sexually abused says Aamir Khan daughter Ira)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.