ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. (Chandrapur car Accident)

ताडोबा फिरायला निघालेल्या पर्यटकांच्या गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 6:56 PM

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी येत असलेल्या पर्यटकांच्या वाहनाला भीषण अपघात (Accident of car) झाला आहे. हा अपघात चिमूर तालुक्यातील मासळ गावात घडला. या अपघातात दोघांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहन नागपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

मिळालेल्या माहितीनुसार, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफरीसाठी काही पर्यटक चिमूरमार्गे जात होते. यावेळी मासळ गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात गाडी भडगा नाल्यात कोसल्याने गाडीतील सर्वच प्रवाशी जखमी झाले. या अपघातात सना अग्रवाल या 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच, 40 वर्षीय मिनू अग्रवाल यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एकूण 3 जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ बचावकार्य करत जखमींना रुग्णालयात रवाना केले. तसेच, नागरिकांनी सतर्कता दाखवत पोलिसांना पाचारण केले. यावेळी घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी तपासकार्य सुरू केले आहे. पोलिसांच्या तपासातून अपघातग्रस्त वाहन आणि पर्यटक नागपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अचानक अपघात झाल्याने सर्वांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात आहे. (Accident of car in Chandrapur Two dead Three injured)

संबंधित बातम्या :

लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

बीडमध्ये भीषण अपघात, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांसह पाच जणांचा मृत्यू

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.