पुण्यात फोर्ड आयकॉन कारमध्ये 13 हत्ती कॅन देशी दारु, 440 लिटर दारुसह गाडी जप्त
पुण्यात चक्क फोर्ड आयकॉन कारमधून तब्बल देशी दारुची तस्करी झाल्याचं समोर आलं आहे (Liquor smuggling in Pune).
पुणे : कोरोनाच्या काळातही दारु तस्करीला चांगलाच जोर आलेला दिसत आहे. पुण्यात चक्क फोर्ड आयकॉन कारमधून देशी दारुची तस्करी झाल्याचं समोर आलं आहे (Liquor smuggling in Pune). खंडणी विरोधी पथकाने अशी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर पुण्यातील तरवडे वस्ती येथे कारवाई करण्यात आली. अनिकेत रविंद्र कुंभार (24, रा. संभाजीनगर, धनकवडी), राकेश रतन कुंभार (40, रा. धनकवडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या कारवाईत दोन्ही आरोपींकडून अडीच लाख रुपयांची कार आणि 44 हजार रुपयांची 440 लिटर देशी दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस नाईक अमोल पिलाणे यांनी फिर्याद दिली आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्यांना फुरसुंगी गावातून मंतरवाडी रस्त्याने धनकवडीकडे एक फोर्ड आयकॉन गाडी जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामध्ये गावठी दारुचे कॅन असल्याचीही गुप्त माहिती होती. त्यानूसार फुरसुंगी गावाजवळ 2 पथके तयार करुन सापळा रचण्यात आला.
फुरसंगी गावाजवळ संशयित कार येताना दिसताच ती कार अडवण्यात आली. यानंतर त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेण्यात आली. यावेळी गाडीच्या डिकीमध्ये 6 हत्ती कॅन, चालकाच्या सिटच्या कडेला 1 कॅन, मागील सीटवर 6 हत्ती कॅन अशी 440 लीटर देशी दारु पकडण्यात आली.
हेही वाचा :
पुण्यातील 200 पेक्षा अधिक उद्यानं 4 महिन्यांपासून बंद, पालिका उत्पन्नाला कोट्यावधींचा फटका
“घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे”, पुणे महापौरांचे आवाहन
Pune Rain | पुणेकरांची तहान वर्षभर भागणार, पुण्यातील धरणांमध्ये 62.21 टक्के पाणीसाठा
Liquor smuggling in Pune