सोशल मीडियावर ‘कोरोनाग्रस्तां’चं नाव उघड करताना सावधान

सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची तक्रार आमच्याकडे आल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरांनी सांगितलं. Corona Patient Identity Disclose

सोशल मीडियावर 'कोरोनाग्रस्तां'चं नाव उघड करताना सावधान
Follow us
| Updated on: Mar 12, 2020 | 9:41 AM

पुणे : ‘कोरोनाग्रस्त’ रुग्णांचं नाव अतिउत्साहाच्या भरात सोशल मीडियावरुन उघड करताना सावधगिरी बाळगा. कारण रुग्णांची ओळख उघड करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे. (Corona Patient Identity Disclose)

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. आपत्ती काळात प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्वांचीच असते. नावं उघड झाल्यास विनाकारण अशा रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो, असं मत डॉ. म्हैसेकरांनी व्यक्त केलं.

नागरिकांनी सामाजिक भान ठेवणे आवश्यक आहे. कोरोना संशयित किंवा रुग्णांची नावे उघड करता कामा नयेत, असं आम्ही पहिल्या दिवसापासून आवाहन करत आहोत. परंतु सोशल मीडियातून कोणीतरी चुकीची माहिती प्रसारित करुन समाजामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे, असंही म्हैसेकरांनी सांगितलं.

तक्रारीनुसार पोलिस विभागाचा सायबर सेल लक्ष ठेवून आहे. कोणीही अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला.

‘समाजानं वाळीत टाकलं’, कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची तक्रार

पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबाला काळजीसोबतच मनस्तापालाही सामोरं जावं लागत आहे. आपल्यावर सामाजिक बहिष्कार टाकून वाळीत टाकल्याचा आरोप संबंधित कुटुंबाने केला. या प्रकरणी कुटुंबीयांनी वकिलांच्या माध्यमातून थेट विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

“रुग्णांच्या कुटुंबीयांना समाजाकडून वाईट वागणूक मिळत आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास, फिरण्यास आणि पाणी भरण्यास मज्जाव केला जात आहे. सर्व कामे घरातच करावी, घरातील भांडी आणि धुण्याचे पाणीही बाहेर फेकू नये, असं बजावलं जात आहे. समाजाकडून अशाप्रकारची वागणूक फक्त एकाच कुटुंबाला नाही तर इतर रुग्णांच्या कुटुंबीयांनाही दिली जात आहे, असा दावा वकील अॅड. किशोर पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

हेही वाचाखोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

कोरोनाची लागण झालेले पुण्यात आठ, मुंबईत दोन, तर नागपुरात एक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या :

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?

Corona Patient Identity Disclose

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.