काजोलची ‘ही’ अट अजय देवगणने मान्य केली; पण, वागदत्त वर झाला योग गुरु… कोण होता तो?
अजय देवगण याने काजोलला प्रपोज केले होते. त्यावेळी काजोल हिने अजय याच्यासमोर एक अट घातली होती आणि ती त्याने मान्यही केली. मात्र, त्यांचे लग्न झाले आणि आज ते एक आदर्श जोडपे बनले आहे. दोन मुलांचे पालक आहेत.
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची जोडी ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटात दिसली. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटाची कथा उत्कृष्ट होती त्यामुळे ती बॉक्स ऑफिसवर गाजली. या चित्रपटाचे बजेट 7.50 कोटी रुपये होते. पण, बॉक्स ऑफिसवर त्याने 31.55 कोटी रुपये कमवले आणि तो सुपरहिट ठरला. मात्र, याच चित्रपट दरम्यान अजय देवगण याने काजोलला प्रपोज केले होते. त्यावेळी काजोल हिने अजय याच्यासमोर एक अट घातली होती आणि ती त्याने मान्यही केली. मात्र, त्यांचे लग्न झाले आणि आज ते एक आदर्श जोडपे बनले आहे. दोन मुलांचे पालक आहेत.
‘प्यार तो होना ही था’ मधील अजय देवगण आणि काजोल यांची जोडी पाहून प्रत्येकजण ‘ते एकमेकांसाठी बनले आहेत.’ असेच म्हणत होते. पण, त्यांचे प्रेम हे याच चित्रपटाच्या यशावर अवलंबून होते. 15 जुलै 1998 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे संगीत जतिन-ललित आणि सुरिंद सोधी यांनी दिले होते. या चित्रपटाची कथा, गाणी, संवाद आणि अजय-काजोलची जोडी सर्वांनाच आवडली होती.
अजय देवगण आणि काजोल हे ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यावेळी अजयने काजोलला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यावेळी काजोलने अजयसमोर एक अनोखी अट ठेवली होती. काजोल हिने ‘जर हा चित्रपट हिट झाला तर ती लग्न करेल. नाही तर त्याबद्दल पुढे कधीच बोलणार नाही.’ असे म्हटले होते. काजोलची ही अट अजय देवगण याने मान्य केली. सुदैवाने हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अजय-काजोल यांनी 24 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केले.
अजय देवगण आणि काजोल या जोडीचा हा शेवटचा सुपरहिट चित्रपट होता. कारण, यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र, त्यानंतर ही जोडी ‘तानाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात दिसली होती. पण, यामध्ये अजय याची मुख्य भूमिका होती. ‘प्यार तो होना ही था’ मध्ये एक चुंबन दृश्य चित्रीत केले होते. हॉलीवूड चित्रपटांमध्ये त्याला फ्रेंच कीस म्हणत. त्यापूर्वी फार कमी भारतीयांना फ्रेंच किस नाव माहित होते. या चित्रपटामुळे हे नाव अधिक प्रसिद्ध झाले.
कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने याच चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तो एका छोट्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात काजोलच्या वागदत्त वराची भूमिका बिजय आनंद याने केली होती. या चित्रपटानंतर त्याला 22 चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण, त्यातून वेगळे होऊन ते योग आणि आध्यात्मिक शिक्षक झाले. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर त्याने 2018 मध्ये टीव्हीवर पुनरागमन केले.