मुंबई : ‘मुन्नाभाई’ सीरीज ‘सर्किट’च्या भूमिकेने घराघरात पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी यालाही वीज बिलामुळे शॉक बसला. लाखभर रुपयाचे वीज बिल आल्याचे सांगत अर्शदने ट्विटरवर आगपाखड केली होती, मात्र अखेर प्रॉब्लेम सुटल्याचे सांगत अर्शदने ट्वीट डिलीट केले आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे आभारच मानले. (Actor Arshad Warsi calls Adani Highway Robber after getting Electric Bill more than a Lac)
“हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट केले” असे ट्वीट अर्शदने केले. त्यासोबत अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा खळाळून हसतानाचा फोटो अर्शदने शेअर केला होता.
This is my electricity bill from the highway robbers called ADANI, who is having a good laugh at our cost. UPDATE: INR 1,03,564.00 debited from A/c on 05-JUL-20… pic.twitter.com/VBddvjlpPy
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020
“बिलिंगच्या मुद्यावरील आपली चिंता आम्ही समजू शकतो आणि आपल्याला मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, परंतु वैयक्तिक बदनामीकारक टीका खपवून घेतली जाणार नाही. आपल्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो.” असे उत्तर अर्शदला ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ कडून देण्यात आले.
We can understand your concern on the billing issue and are here to help you, but we do not appreciate the personal defamatory remarks and advise you to practice caution.
— Adani Electricity (@Adani_Elec_Mum) July 5, 2020
अखेर अर्शदने ट्वीट डिलीट करत अदानी इलेक्ट्रिसिटीचे आभार मानले.
And yes there is a light at the end of the tunnel. Quick response from @Adani_Elec_Mum problem solved. All you have to do is contact them…. thank you ?? …
— Arshad Warsi (@ArshadWarsi) July 5, 2020
याआधी अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही वाढीव वीज बिलाची तक्रार ट्विटरवर केली होती. “3 महिन्यांचा लॉकडाऊन आणि मला आश्चर्य वाटते की गेल्या महिन्यात मी अशी कोणतीही उपकरणे नव्याने वापरली किंवा विकत घेतली की माझ्या विजेच्या बिलात इतकी वेगाने वाढ होईल. अदानी इलेक्ट्रिकल, आपण कोणत्या प्रकारच्या ‘पॉवर’साठी ही किंमत आकारत आहात?” असा सवाल तापसीने विचारला होता. दरमहा येणारे 3800 रुपयांचे आणि यंदा आलेले 36 हजार रुपयांच्या बिलाचे फोटो तिने शेअर केले होते.
3 months of lockdown and I wonder what appliance(s) I have newly used or bought in the apartment only last month to have such an insane rise in my electricity bill. @Adani_Elec_Mum what kind of POWER r u charging us for? pic.twitter.com/jZMMoxDMgj
— taapsee pannu (@taapsee) June 28, 2020
दरम्यान, लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या कालावधीत आलेलं 50 टक्के वीज बिल माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यात वीज बिलाबाबत लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. लाॅकडाऊनच्या काळात तीन महिन्यातलं भरमसाठ बिल आलं आहे, त्यामुळे लोकांची नाराजी आहे. त्यामुळेच लाॅकडाऊनमध्ये तीन महिन्यात आलेलं वीज बिल निम्म्याने माफ करावं, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये घरगुती विजेचा वापर वाढला, बिलाचे हप्ते पाडून देणार : ऊर्जामंत्री
“लॉकडाऊन काळात मार्गदर्शक सूचनांनुसार मीटर रिडिंग बंद करण्यात आले होते. त्यानंतर बिलाबाबत काही गैरसमज झाले होते. त्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्याची सवलत वीज बिल भरायला देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना तक्रारी असतील त्यांच्यासाठी उर्जामंत्र्यांचा ईमेल आयडी देण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिकांनी वर्क फ्रॉम होम केले आहे. त्यामुळे वीजेचा वापर गेल्या वर्षापेक्षा जास्त केला आहे,” असेही उर्जामंत्र्यांनी सांगितले
हेही वाचा : वर्क फ्रॉम होममुळे वीजेचा वापर वाढला, प्रत्यक्ष रिडिंग घेऊ, तक्रारीसाठी ई-मेल आयडी : ऊर्जामंत्री
(Actor Arshad Warsi calls Adani Highway Robber after getting Electric Bill more than a Lac)