पिझ्झा डिलीव्हरी बॉयकडून अभिनेत्रीचा नंबर अडल्ट ग्रुपवर शेअर, तक्रार दाखल
तामिळ चित्रपटातील अभिनेत्री गायत्री सईने एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली (Gayatri Sai number shared adult groups) आहे.
चेन्नई : तामिळ चित्रपटातील अभिनेत्री गायत्री सईने एका पिझ्झा डिलीव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली (Gayatri Sai number shared adult groups) आहे. घरी पिझ्झा डिलीव्हरी करण्यास आलेल्या मुलाने माझा फोन नंबर व्हॉट्सअॅपच्या एका अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला, असा आरोप अभिनेत्री गायत्री सईने केला आहे. याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट (Gayatri Sai number shared adult groups) केली.
गायत्री सईने ट्विटरवर याबाबत एक पोस्ट केली आहे. या पोस्ट सोबत तिने पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या त्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. “डॉमिनोज इंडिया या पिझ्झा कंपनीचा पिझ्झा डिलीव्हरी करणाऱ्या एका मुलाने 9 फेब्रुवारीला माझ्या चेन्नईच्या घरी पिझ्झा दिला. त्यावेळी तो मुलगा नशेत होता. त्याने माझा फोन नंबर एका अडल्ट ग्रुपमध्ये शेअर केला.”
.@dominos_india I thought you gave a statement to support the case but looks like you want to close it. I am a shareholder of jubilant foods and feel this totally not fare at all . This case should be put under crime against women @DrMRaviIPS1 @TNPOLICE_HQ
— Gayatri Sai (@gainsai) February 27, 2020
याबाबत तिने तक्रार दाखल केल्यानंतर तिला डॉमिनॉजच्या कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,” असा आरोप त्या अभिनेत्रीने केला आहे.
.@DrMRaviIPS1 commisioner called and said he is transferring the case to protection under women Sir. Hope other online apps do not share our numbers. Most of our orders these days are online. The complaint is lodged in Teynampet station sir https://t.co/0RiKZIo9es
— Gayatri Sai (@gainsai) February 27, 2020
याप्रकरणी ज्या डिलीव्हरी बॉयने माझा नंबर शेअर केला. त्याच्याविरुद्ध माझ्याकडे अनेक कॉल्स आणि व्हॉट्सअॅप मॅसेज आहे. तुम्ही सर्व याबाबत सावधानता बाळगा, असे ट्विट गायत्रीने केले आहे. यासोबतच काही व्हॉट्सअॅपचे मॅसेजही तिने शेअर केले (Gayatri Sai number shared adult groups) आहेत.
.@TNPOLICE_HQ Thank you for filing an FIR . Hope @dominos_india make their app more private like other food delivery apps where the number is not shared to your guest directly . Hope you help with the investigation and not try to close the case ?. Hope the boys are arrested.?
— Gayatri Sai (@gainsai) February 28, 2020
अभिनेत्री गायत्रीच्या या ट्विटनंतर पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत हे प्रकरण चेन्नईच्या महिला पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गायत्रीने तामिळनाडू पोलिसांचे आभार मानले आहे.
.@dominos_india guy delivered pizza at my place in Chennai in a intoxicated state on the 9th of feb and shared my number in adult groups and a complaint is pending since ur office is yet to speak to me . I have numerous calls and WhatsApp which he has shared .please be safe all pic.twitter.com/CehVmWwBkL
— Gayatri Sai (@gainsai) February 26, 2020
गायत्री सई या अभिनेत्रीने अंजली या चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. दिग्दर्शक मणीरत्नम यांनी 1990 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला (Gayatri Sai number shared adult groups) होता.