Govinda | ‘नेहमी मीच बळीचा बकरा ठरतो’, कृष्णाच्या आरोपांवर गोविंदाचा पलटवार!

गेल्या काही वर्षांपासून या गोविंदा आणि कृष्णा यांच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. यामुळेच कृष्णा त्या भागात गैरहजर होता.

Govinda | ‘नेहमी मीच बळीचा बकरा ठरतो’, कृष्णाच्या आरोपांवर गोविंदाचा पलटवार!
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 4:30 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने (Actor Govinda) लोकप्रिय कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’च्या मंचावर हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या त्या भागात गोविंदा आल्याने, त्याचा भाचा अभिनेता कृष्णा अभिषेक (Krushna Abhishekh) दिसला नव्हता. गेल्या काही वर्षांपासून या गोविंदा आणि कृष्णा यांच्या कुटुंबात वाद सुरू आहेत. यामुळेच कृष्णा त्या भागात गैरहजर होता. त्यानंतर माध्यमांनी कृष्णावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. कृष्णानेही या दरम्यान अनेक खुलासे केले होते. मात्र, या सगळ्यावर चुप्पी साधलेल्या गोविंदाने अखेर आपले मौन सोडले आहे (Actor Govinda Reacted On Krushna Abhishek’s allegations after The Kapil Sharma Show).

माध्यमांतील या वृत्तांवर गोविंदा म्हणतात, ‘कृष्णाने अशा प्रकारे माध्यमांतून निवेदने दिल्यामुळे मला फार वाईट वाटले आहे. पण, मला आता असे वाटते की लोकांसमोर सत्य आणण्याची वेळ आली आहे.’ यानंतर गोविंदाने देखील कृष्णाचे अनेक दावे फेटाळून लावले आहेत.

काय म्हणाला गोविंदा?

एका अग्रगण्य दैनिकाच्या पहिल्या पानावर मी कृष्णा अभिषेकबद्दल बातमी वाचली. मी मंचावर असल्याने कृष्णा तिथे आला नाही, असे त्यात म्हटले होते. पण नंतर कृष्णाने आमच्या नात्याबद्दल माध्यमांना बरेच काही सांगितले. या माझ्यावर अनेक बदनामीकारक टीका करण्यात आल्या होत्या’, असे गोविंदा म्हणाला.

‘मी त्याच्या जुळ्या मुलांना भेटायला गेलो नाही, ही कृष्णाने केलेले आरोप चुकीचे आहेत. मी माझ्या कुटुंबासमवेत रूग्णालयात त्यांची जुळी मुले पाहण्यासाठी गेलो आणि डॉक्टर (डॉक्टर अवस्थी) आणि नर्स यांनाही भेटलो. तथापि, नर्सने आम्हाला सांगितले की, त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने येऊन आपल्या मुलांना बघू नये, असे आदेश मुलांची आई, काश्मिरा शाह हिने दिले होते. खूप विनवण्या केल्यानंतर, आम्हाला मुलांना लांबून पाहण्याची परवानगी देण्यात आली. जड अंतःकरणाने दूरवरुन बाळांना पाहून आम्ही घरी परतलो. मला खात्री आहे की, कृष्णाला या घटनेविषयी माहिती नसावी.’

गरज भासल्यास त्या डॉक्टर व परिचारिकांना विचारून या संपूर्ण घटनेची सत्यता कृष्णाने पडताळावी, असे गोविंदा यांनी म्हटले(Actor Govinda Reacted On Krushna Abhishek’s allegations after The Kapil Sharma Show).

मी नेहमीच बळीचा बकरा बनलो…

गोविंदा म्हणतो, ‘कृष्णा असो वा काश्मिरी, माझ्याविरूद्ध केलेल्या अपमानास्पद टिप्पण्या व वक्तव्यात मी नेहमीच बळीचा बकरा बनलो आहे. या गोष्टी बर्‍याच माध्यमांमध्ये आणि कधीकधी काही कार्यक्रमांमध्ये आणि सादरीकरणांमध्ये देखील चर्चिल्या जातात. त्याच्या या निंदेचे कारण काय आणि हे लोक त्यातून काय मिळवत आहेत, हे मला समजत नाही. कृष्णा लहान असल्यापासूनच माझे आणि त्याचे खूप छान नाते होते. माझे त्याच्यावर खूप प्रेम होते याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक मंडळी साक्षी आहेत.’

अशा खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणणे चुकीचे आहे. मात्र, आपल्याबाबतीत जर लोकांचा गैरसमज होत असेल आणि त्याचा फायदा घेतला जात असेल, तर बोलावे लागते, असे गोविंदा म्हणाला.

(Actor Govinda Reacted On Krushna Abhishek’s allegations after The Kapil Sharma Show)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.