Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’वर आता ‘शक्तिमान’ही नाराज, मुकेश खन्नांकडून मेकर्सवर हल्लाबोल!
मुकेश खन्नांनीही त्याच जुन्या तथ्यांचा आधार घेत या पोस्टमध्ये आपला रोष व्यक्त केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’मुळे (Laxmmi Bomb) चर्चेत आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादांत अडकला आहे. चित्रपटाचे प्रमोशन जबरदस्त मार्गाने सुरू आहे, पण त्यावरून होणारा वाद काही संपण्याचे नावच घेत नाहीय. चित्रपटाच्या शीर्षकापासून कथेपर्यंत प्रत्येक पैलूवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. बर्याच संघटना या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. त्यातच आता अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहीत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. (Actor Mukesh Khanna Slams Laxmmi Bomb Makers)
‘लक्ष्मी बॉम्ब’ वादावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, या चित्रपटावर ‘बंदी’ घालण्यात यावी, या मागणीला त्यांनी सहमती दर्शवली नाही. त्यांच्या दृष्टीने, अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु, या चित्रपटाचे शीर्षक मात्र चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोष व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर
या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लक्ष्मीसमोर बॉम्ब हा शब्द लिहिणे ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. व्यावसायिक हितसंबंधांचा विचार करून हा खोडकरपणा करण्यात आला आहे. मग त्याला मंजुरी मिळावी का? अर्थात, अजिबात नाही. आपण ‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जिझस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकतो का? नाही ना? मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवता?’
‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाविषयी आधीही असेच वाद निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत मुकेश खन्नांनीही त्याच जुन्या तथ्यांचा आधार घेत या पोस्टमध्ये आपला रोष व्यक्त केला आहे. चित्रपटांच्या नावाखाली हिंदूंचा अपमान करणाऱ्या प्रत्येक चित्रपट निर्मात्यावर त्यांनी टीका केली आहे. (Actor Mukesh Khanna Slams Laxmmi Bomb Makers)
चित्रपटाच्या जाहिरातबाजीसाठी मेकर्सचे स्टंट
यावर भाष्य करताना मुकेश खन्ना यांनी पुढे लिहिले की, ‘असे करण्याचे धाडस केवळ चित्रपट क्षेत्रातील लोकच करू शकतात. त्यांना माहित आहे की, असे केल्याने कोलाहल निर्माण होईल.लोकांमध्ये गोंधळ माजेल. ते खूप आरडाओरडा करतील आणि काही काळाने गप्प बसतील. पण, या सगळ्यात चित्रपटाची जाहिरात होईल. हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि पहिल्याच दिवशी तिकिटे मिळविण्यासाठी लोक धावतील. हे असेच आधीही होत होते आणि आताही सुरूच आहे.’(Actor Mukesh Khanna Slams Laxmmi Bomb Makers)
मेकर्सचा हा डाव हाणून पाडा
याचबरोबर त्यांनी हा चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावत असल्याचे देखील म्हटले आहे. ‘हिंदूंना सॉफ्ट टार्गेट केले जाते आहे’, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हिंदू देव-देवतांविषयी चित्रपटात वाटेल ते दाखवले जाते. चित्रपट व्यावसायिकांमध्ये कोणतीही भीती उरलेली नाही. त्यांना माहित आहे की जर त्यांनी इतर कोणत्याही धर्माविषयी असे म्हटले तर, तलवारी बाहेर येतील. म्हणूनच इतर धर्मातील देवांची नावे घेतली जात नाहीत. अशी वादग्रस्त शीर्षके केवळ चित्रपटांना हिट करण्यासाठी दिली जातात, असे म्हणत त्यांनी मेकर्सचा हा डाव हाणून पाडा असे आवाहन केले आहे.
(Actor Mukesh Khanna Slams Laxmmi Bomb Makers)
संबंधित बातम्या :
अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज
Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!