Warrior Aaji | सोनू सूदने करुन दाखवलं, पुण्याच्या मर्दानी आजीचे ट्रेनिंग सेंटर
पुण्याच्या 'वॉरिअर आजी' शांताबाई पवार यांचे ट्रेनिंग सेंटर सुरु करण्याबाबत अभिनेता सोनूने सूदने दिलेला आपला शब्द पाळला आहे.
पुणे : लाठ्याकाठ्यांचा खेळ खेळून भल्याभल्यांना अचंबित करणाऱ्या पुण्याच्या 85 वर्षांच्या आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या. त्यानंतर ‘वॉरिअर आजी’ अशी ओळख मिळालेल्या शांताबाई पवार यांना मदत करण्याची इच्छा अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद यांनी व्यक्त केली होती. सोनूने आपला शब्द पाळला असून लवकरच आजीचे ट्रेनिंग सेंटर सुरु होणार आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्तावर याचा श्रीगणेशा होणार आहे. (Actor Sonu Sood to open training school with Pune Warrior Aaji Shantabai Pawar)
‘निर्मिती’ संस्थेने ट्विटरवर शांताबाई पवार यांच्यासह फोटो शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली. “निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरु करण्याचे स्वप्न “निर्मिती फाऊंडेशन” येणाऱ्या बावीस ऑगस्टला सत्यात उतरवत आहे. सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे.” असे त्यात म्हटले आहे.
आज निर्मिती परिवारातील सदस्यांनी #Warrior_aaji यांची भेट घेतली. शब्द दिल्याप्रमाणे त्यांचे क्लास सुरू करण्याचे स्वप्न “निर्मिती फाऊंडेशन” येणाऱ्या बावीस ऑगस्ट ला सत्यात उतरवत आहे.सोनू सूद यांची मोलाची मदत मिळाली असून लवकरच आजीचे हक्काचे व्यासपीठ त्यांना मिळणार आहे.#निर्मिती pic.twitter.com/MchttIn4ET
— निर्मिती (@Nirmiti4Change) August 16, 2020
“या आजींचे काही तपशील मिळू शकतील का? त्यांच्याबरोबर एक लहान प्रशिक्षण शाळा सुरु करायची आहे. जिथे त्या आपल्या देशातील महिलांना काही आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवू शकतील.” असे ट्वीट सोनू सूदने केले होते.
Can I get her details please. Wanna open a small training school with her where she can train women of our country some self defence techniques . https://t.co/Z8IJp1XaEV
— sonu sood (@SonuSood) July 24, 2020
(Actor Sonu Sood to open training school with Pune Warrior Aaji Shantabai Pawar)
शांताबाई पवार कोण आहेत?
ढालपट्टा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील आजीबाई सोशल मीडियावर स्टार झाल्या होत्या. जुलै महिन्याच्या अखेरीस त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शांताबाई 85 व्या वर्षीही अगदी सफाईने काठ्या फिरवत असल्याचे पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले. अभिनेता रितेश देशमुखनेही आजींशी संपर्क साधला. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेत एक लाखांचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन आजींचा सन्मान केला होता.
शांताबाईंनी ‘टीव्ही9 मराठी’ शी बोलताना आपला प्रवास उलगडला. उघड्यावर पडलेल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे दहा अनाथ मुलींचा सांभाळ करते, तिघींना लग्न करुन सासरी पाठवले, असेही आजींनी सांगितले होते. कोरोनाची भीती होती, मात्र फिकीर न करता घर चालवण्यासाठी मी या काळातही बाहेर पडले, असं आजींनी सांगितले होते.
“काही वर्षांपूर्वी तारेवर चालताना पाय मोडला होता, तर बाटलीवर तोल सांभाळताना पडून हाताला दुखापत झालेली. त्यानंतर शस्त्रक्रिया झाली, हात अजूनही दुखतो, तरीही जिद्दीने हे खेळ अजूनही खेळते आणि पोटाची खळगी भरते” असे आजी म्हणाल्या होत्या.
वयाच्या आठव्या वर्षी शांताबाई पवार यांनी हा लाठ्याकाठ्यांचा खेळ (ढालपट्टा) खेळण्यास सुरुवात केली. या काळात ‘सीता और गीता’ सिनेमात ‘अनाडी है कोई खिलाडी है कोई’ या गाण्यात हेमा मालिनी यांच्या डमी म्हणून डोंबारी खेळ त्यांनी खेळले. याशिवाय त्रिदेव सिनेमा, एक मराठी चित्रपट अशी काही शूटींगही त्यांनी केली.
संबंधित बातम्या :
Shantabai Pawar | पुण्यातील आजीबाईंचा लाठ्याकाठ्यांचा खेळ, रितेशही म्हणाला ‘लय भारी’
मर्दानी आजीला 1 लाख आणि साडीचोळी, गृहमंत्री अनिल देशमुख थेट दारात
(Actor Sonu Sood to open training school with Pune Warrior Aaji Shantabai Pawar)