मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना चौकशीला बोलावलं जात आहे. आता या प्रकरणात दिग्दर्शक महेश भट आणि धर्मा प्रॉडक्शनचे प्रमुख करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. तसेच धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Karan Johar may call for Investigation)
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अपूर्व मेहता यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. अपूर्व मेहता यांना वांद्रे पोलिसांनी समन्स पाठवला आहे. यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलं आहे.
नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिग्दर्शक करण जोहर यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. यावेळी खरंच चित्रपट क्षेत्रात घराणेशाही आहे का? याबाबतची चौकशी केली जाणार आहे. याआधी पत्रकार राजीव मसंद यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
सुशांत सिंहच्या आत्महत्येचा पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 38 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात सुशांतचे कुटुंबिय, त्याचे नातेवाईक, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश आहे. यामध्ये पोलीस व्यस्त आहेत.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांचा उलटा तपासही सुरु केला आहे. सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली होती. त्या दिवशी पोलिसांनी सुशांतचे वडील आणि इतर नातेवाईक यांना कुणावर संशय आहे का, असं विचारलं होतं. त्यांचा जबाब नोंदवला होता. मात्र, आता एक महिन्यानंतर पुन्हा पोलिसांनी सुशांतच्या नातेवाईकांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यास सुरुवात केली आहे.
सुशांत सिंह राजपूत याने रविवारी 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे. (Sushant Singh Rajput Suicide Case Karan Johar may call for Investigation)
संबंधित बातम्या :
Ankita Lokhande | सुशांतच्या निधनाला एक महिना पूर्ण, अंकिता लोखंडेची इंस्टाग्राम पोस्ट
Rajeev Masand | सुशांतच्या सिनेमांना कमी स्टार, चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांची चौकशी