‘तुझ्यात जीव रंगता’ना ‘का रे दुरावा’? सुयश टिळक-अक्षया देवधरच्या ब्रेकअपची चर्चा

सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांचे ब्रेकअप झाल्याचे आराखडे त्यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे बांधले जात आहेत

'तुझ्यात जीव रंगता'ना 'का रे दुरावा'? सुयश टिळक-अक्षया देवधरच्या ब्रेकअपची चर्चा
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 6:01 PM

मुंबई : अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे मराठी मालिकाविश्वातील चर्चेतलं जोडपं. दोघांनीही आपल्या नात्याची जाहीर कबुली कधीच दिली नसली, तरी सोशल मीडियावरुन त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगायच्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या नात्यात सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जाते. इन्स्टाग्राममुळे ज्यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती, त्या सुयश-अक्षयाचे ब्रेकअप झाल्याचे आराखडेही इन्स्टाग्राममुळेच बांधले जात आहेत. (Actor Suyash Tilak Actress Akshaya Devdhar allegedly broke up)

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी गाजत असतानाच तिच्या ऑफस्क्रीन अफेअरची चर्चाही रंगू लागली. अंजलीबाईंना त्यांचा ‘रिअल लाईफ राणादा’ दिसला ‘का रे दुरावा’ फेम जयमध्ये… अर्थात अभिनेता सुयश टिळकमध्ये.

अक्षया आणि सुयश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर झळकू लागल्यावर. कधी त्या फोटोंना ‘मिस यू’ कॅप्शन असायचं, तर कधी हार्ट शेप इमोजी, कधी अक्षयाच्या बोटातील अंगठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेऊ लागली. दोघांचा साखरपुडा झाल्यावर चाहत्यांनीच शिक्कामोर्तब केलं. मात्र याला अक्षया किंवा सुयशपैकी कोणीही कधीच दुजोरा दिला नव्हता.

सुयशची ‘का रे दुरावा’ संपली, त्यानंतर बापमाणूस, सख्या रे सारख्या मालिका, चित्रपट, म्युझिक व्हिडीओ, वेब सीरीज अशी त्याची मुशाफिरी होऊ लागली, अक्षया मात्र जवळपास चार वर्षांपासून ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये गुंतून आहे. (Actor Suyash Tilak Actress Akshaya Devdhar allegedly broke up)

View this post on Instagram

Missing u.. ! @suyashtlk Love❤️

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या अक्षया-सुयशच्या नात्यात अचानक माशी कुठून शिंकली याचं चाहत्यांनाही आश्चर्य वाटत आहे. इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी फुटली आणि त्यांचं बिनसल्याच्या चर्चा उठल्या.

सुयश आता ‘खाली पिली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता इशान खट्टर, अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर ‘मंग्या’ नावाचे पात्र सुयश साकारणार आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतून सुयश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र अक्षयासोबतचे ‘शुभमंगल’ तुटल्याच्या चर्चांनी दोघांचे चाहते खट्टू झाले आहेत.

संबंधित बातम्या :

कोल्हापुरात प्रलय, राणादा छत्री धरुन, पाठक बाई गुडघाभर पाण्यात!

(Actor Suyash Tilak Actress Akshaya Devdhar allegedly broke up)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.