अनेकजण चुकले, तुम्हीच ओळखा, ‘हा’ अभिनेता कोण?
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार मंडळींचे अनेकजण फॅन असतात. अनेकजणांना तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडींबद्दलही उत्सुकता असते. मग त्या कलाकारांबद्दल रंजक गोष्टी वाचणं-ऐकणं असो किंवा त्यांचे वेगवेगळे फोटो जमवणं, पाहणं असो. अशाच एका अभिनेत्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केलीच आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका […]
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार मंडळींचे अनेकजण फॅन असतात. अनेकजणांना तर त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडींबद्दलही उत्सुकता असते. मग त्या कलाकारांबद्दल रंजक गोष्टी वाचणं-ऐकणं असो किंवा त्यांचे वेगवेगळे फोटो जमवणं, पाहणं असो. अशाच एका अभिनेत्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या अभिनेत्याने आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केलीच आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका सिनेमामुळे तर त्याने भारतीयांच्या मनात देशाभिमानही जागवला होता.
आम्ही तुमची उत्सुकता फार ताणून धरणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित ‘उरी’ सिनेमामुळे सबंध भारतभर ज्या अभिनेत्याच्या अभिनयाचं कौतुक झालं, त्या विकी कौशलच्या फोटोने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
झालं असं की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आतापर्यंत या फोटोला 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
हा फोटो शेअर करत विकीने पोस्टमध्ये म्हटलं, “पोस्ट शेव लूक”. या फोटोवर बॉलिवूड कलाकारांनीही कॉमेंट केल्या आहेत. फोटोवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने म्हटले, बॉर्न लूक, दिया मिर्जाने म्हटले, Awwwww, गौरव गोराने म्हटले, बीबी मुडा, बिपाशा बासूने म्हटले, छोटा विकी क्यूट. अशा कॉमेन्ट विकीच्या फोटोवर कलाकारांनी केल्या आहेत.
विकी कौशलच्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये ‘लव्ह शव ते चिकन खुराना’ सिनेमातून झाली होती. मात्र त्याची खरी ओळख 2015 मध्ये ‘मसान’ या चित्रपटामुळे झाली. या चित्रपटामुळे विकी कौशल सर्वांच्या समोर आला. तेव्हापासून विकी सतत सिनेमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येत असतो.
नुकतेच जानेवारी महिन्यात उरी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत विकी कौशल याने काम केलं आहे. या सिनेमातील त्याचा अभिनय सर्वांना आवडला. जवानांवर आधारीत सिनेमा असल्यामुळे अनेकांनी या सिनेमाला मोठा प्रतिसादही दिला.