उपासमारीची वेळ आली, आता नाट्य-सिनेमागृहं 1 ऑगस्टपासून सुरु करा, पुण्यातील कलाकारांच्या संस्थांची मागणी
पुण्यातील कलाकारांच्या सर्व संस्थानी 1 ऑगस्टपासून पुण्यातील नाट्यगृहं, सिनेमागृहं सुरु करण्याची आग्रही मागणी केली (Pune Actors demand to open theaters).
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन लागू असल्याने नाट्यगृहं, सिनेमागृहं बंद आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्याने कलाकारांना काम मिळत नाही, तर पडद्यामागील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच मुद्द्यावर पुण्यातील कलाकारांच्या सर्व संस्थानी एकत्र येत 1 ऑगस्टपासून पुण्यातील नाट्यगृहं, सिनेमागृहं सुरु करण्याची आग्रही मागणी केली आहे (Pune Actors association demand to open theaters). तसेच मागणी मान्य न झाल्यास शनिवारपासून (1 ऑगस्ट) उपोषणाचा इशारा या संस्थांनी दिला आहे.
पुण्यात नाट्यगृहं, सिनेमागृहं सुरु करण्याच्या मागणीचा जोर वाढत आहे. या मागणीसाटी पुण्यातील कलाकारांच्या सर्वच संस्था एकत्र आल्या आहेत. यात लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाटय-चित्रपट, एकपात्री, नृत्य, साऊंड-इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन या सर्व संस्थांचा समावेश आहे. पुण्यातील या सर्व संस्थाप्रमुखांनी नुकतीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बैठक केली. यावेळी सर्वांनी 1 ऑगस्टपासून पुण्यातील नाट्यगृहं आणि सिनेमागृहं सुरु करण्याची मागणी केली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
कोरोनामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्याने कलाकारांना काम नाही, तर पडद्यामागील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. पुण्यातील लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, नाटय-चित्रपट, एकपात्री, नृत्य, साऊंड-इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन या पुण्यातील सर्व संस्थाप्रमुखांनी एकत्र येऊन सरकारकडे निर्बंध हटवण्याची मागणी केली आहे. पुण्यातील कलाकारांच्या सर्व संस्थानी नाट्यगृहं सुरु झाली नाही, तर येत्या शनिवारी उपोषण करण्याचा इशारा दिलाय.
शहरातील नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु करा. किमान 200 लोकांच्या सुरक्षतेची काळजी घेऊन थिएटर उपलब्ध करुन द्या, अशी आग्रही मागणी पुण्यातील कलाकारांनी केली आहे. आपली मागणी मान्य झाली नाही, 1 ऑगस्टपर्यंत नाट्यगृह सुरु झाली नाही, तर उपोषण करण्याचा इशारा संबंधित संस्थांनी दिलाय. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेणार असल्याचं या कलाकारांनी सांगितलं.
हेही वाचा :
Pune Corona | 31 जुलैपर्यंत पुण्यात 60 हजार कोरोना रुग्ण असतील, अतिरिक्त आयुक्तांची माहिती
Bakrid 2020 | बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी नाही : नवाब मलिक
Pune Actors association demand to open theaters