Jui Gadkari: जवळची व्यक्ती गमावली ; अभिनेत्री जुई गडकरीने फेसबुक पोस्टद्वारे मांडले कर्जतमधील भयानक वास्तव

कर्जत : अभिनेत्री जुई गडकरीने(Actress Jui Gadkari) एक लक्षवेधी फेसबुक पोस्ट(Facebook post ) केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जुईने कजर्तमधील(Karjat) आरोग्य व्यवस्थेची पोल खोल केली आहे. तिच्या परीचयाच्या एका व्यक्तीचा अल्पश: आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर जुईने ही फेसबुक पोस्ट टाकली आहे. जुई ही कर्जतची रहिवासी आहे. त्यामुळे ही पोस्ट करताना […]

Jui Gadkari: जवळची व्यक्ती गमावली ; अभिनेत्री जुई गडकरीने फेसबुक पोस्टद्वारे मांडले कर्जतमधील भयानक वास्तव
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 8:34 PM

कर्जत : अभिनेत्री जुई गडकरीने(Actress Jui Gadkari) एक लक्षवेधी फेसबुक पोस्ट(Facebook post ) केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जुईने कजर्तमधील(Karjat) आरोग्य व्यवस्थेची पोल खोल केली आहे. तिच्या परीचयाच्या एका व्यक्तीचा अल्पश: आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर जुईने ही फेसबुक पोस्ट टाकली आहे. जुई ही कर्जतची रहिवासी आहे. त्यामुळे ही पोस्ट करताना मी “माझ्या” अत्यंत लाडक्या कर्जत बद्दल अशा प्रकारे लिहीतेय याबद्दल वाईट वाटत असल्याचे तिने या पोस्ट मध्ये लिहीले आहे. एक चांगलं हॅास्पिटल आणि २४तास लाईट हे “माझं” स्वप्नं कधी पुर्ण होईल माहित नाही… असं तिने या पोस्टच्या शेवटी लिहीले आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कर्जत शरहातील अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जुईने केला आहे.

जुई गडकरीने केलेली पोस्ट जशीच्या तशी

तसा माझा त्याचा personally काहीच संबंध नव्हता.. त्याचे वडिल आमच्या कडे पुर्वी पंप ॲापरेटर म्हणुन काम करायचे.. आम्ही सगळे लहान होतो.. तो तोव्हा त्याच्या वडलांबरोबर आमच्याकडे यायचा.. आमच्यात खेळायचा.. आजीकडे एक- दोनदा जेवलाही होता आमच्याबरोबर.. आम्ही मोठे झालो.. कामं धंदे सुरु झाले.. तोही कामं करत होता.. मिळतिल ती.. कधी हॅाट्ल मध्ये शेफ, कधी कंत्राटी कामगार, प्लंबर, तर कधी गाण्याचे कार्यक्रम करायचा.. मी कर्जत ला आले की मला न चुकता “ज्युई कशी आहेस?” हे विचारायचा.. आमच्या शेजारच्या वाड्यात राहायचा त्यामुळे तशी नेहामीच भेट व्हायची.. काल अचानक त्याच्या जाण्याची बातमी आली आणि मनात खुप चलबिचल झाली… काय झालं असेल त्याला? अचानक असं कसं? खोटी तर नाही ना बातमी? परवाच तर भेटला होता… etc etc आज कारण कळलं.. ताप आला म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्याला.. सलाईन लावलं.. त्याच्या तोंडातुन फेस आला.. तब्येत खालावली.. म्हणुन पनवेल ला नेलं.. तिथल्या डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केलं… ????? नक्की काय झालं असेल?? काहीच कळत नाही… पण मनात बऱ्याच वर्षांपासुन “कर्जत” च्या या गोष्टी बद्दल असलेली चीड ऊफाळुन आली… सगळ्यांचंच नशिब बलवत्तर नसतं.. काही वर्षांपुर्वी माझ्या वडलांना घरात लग्नं असताना severe heart attack आला आणि त्यांना पनवेल ला न्यावं लागलं.. तिथेही treatment मिळाली नाही म्हणुन मग नेरुळ ला त्यांची प्लास्टी केली.. मुद्दा असा की एवढ्या वर्षात कर्जत मध्ये एक “चांगलं” हॅास्पिटल असु नये??? प्रत्येक वेळी काही medical emergency आली की माणसांना लोदिवली किंवा पनवेल ला न्यायचं???? का??? माणचाचं आयुष्य ईतकं casually का घेतलं जातय ईथे??? बर हॅास्पिटल म्हंटलं कि किमान 24तास विजेची गरज.. तर त्या बद्दल तर न बोललेलच बरं…. मी कर्जतकर आहे आणि म्हणुन मला माझ्या गावात या किमान गरजा पुर्ण झालेल्या हव्यात… एक तास असा जात नाही ईथे जेव्हा लाईट जात नाही.. एरव्ही लोडशेडींग तर हक्काने असतच.. मग काय तर पावसाळा.. मग काय तर आज झाडं कापायची होती.. आज Transformer उडाला.. ई.ई… technical बाबी मान्यच आहेत कारण over heads आहेत.. पण या लाईट च्या सततच्या जाण्याने आपण किती वर्ष मागे मागे चाललोय हे का कळत नाहिये कोणालाच??? कधीही लाईट गेले आणि MSEB ला कॅाल केला कि उत्तर मिळतं खोपोलीवरुन गेलेत… गेली ३४ वर्ष मी आणि किमान ५०-६० वर्ष घरातले ईतर हिच उत्तरं ऐकताहेत!! पण यावर अजुनही solution निघालेलं नाहिये! सगळ्यांकडे Inverter आहेत ईथे… अन्नं वस्त्र निवारा आणि Inverter ह्या करजतकरांच्या किमान गरजा आहेत… पण Inverter charge हेण्यापुरतं तरी लाईट असायला हवेत ना… “मुंबई पासुन अवघ्या २ तासावर” अशी जाहिरात करणारे पण या बाबतित विचार करतच नाही की मुंबई पासुन एवढ्या जवळ असुन ही आमच्याकडे या किमान गरजा २०२२ मध्ये पण पुर्ण झालेल्या नाहियेत.. आणि या बाबतित सगळेच शांत… कितीही जीव का जाईनात आम्हाला “सिंव्हगड बाय डेक्कन” एवढंच लाईफ आहे… वाईट वाटतंय आज हे share करताना कारण आज मी “माझ्या” अत्यंत लाडक्या कर्जत बद्दल अशा प्रकारे लिहीतेय… पण एक चांगलं हॅास्पिटल आणि २४तास लाईट हे “माझं” स्वप्नं कधी पुर्ण होईल माहित नाही… पण आमच्या कर्जतला एकदातरी याच… खुप सुंदर आहे ते… ? जुई गडकरी एक कर्जतकर

कर्जमधील समस्या मांडताना तिने कर्जतमध्ये येण्याचा आग्रह देखील केला आहे. आमच्या कर्जतला एकदातरी याच… खुप सुंदर आहे ते… जुई गडकरी, एक कर्जतकर असे तिने पोस्टच्या शेवटी लिहीले आहे. तिच्या पोस्टवर अनेक कमेट्स येत असून प्रत्येकाने ही समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.