Kajal Aggarwal | काजल अग्रवालच्या लग्नाची तयारी सुरू, नव्या घरात शिफ्ट होणार!
‘सिंघम’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त आहे.
मुंबई : ‘सिंघम’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त आहे. काजल 30 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गौतम किचलूसोबत लग्न करणार आहे. तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी हा एक खास दिवस असणार आहे. काजलने तिच्या लग्नाची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती. मुंबईत हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले होते. कोरोनामुळे, केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे या मित्र लग्नात सामील होणार आहेत.( Actress Kajal Aggarwal marriage update shifting in new house)
लग्नाच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या काजलने नुकताच तिच्या नवीन घराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा होणारा नवरा गौतम किचलू तिला घर सेट करण्यात मदत करताना दिसत आहे. लग्नानंतर दोघेही या नव्या घरात राहायला येणार आहेत. या पोस्टवर तिच्या खास मैत्रिणीने कमेंट केली की, ‘आता काजलला वधूवेशात पाहण्यासाठी वाट बघवत नाहीय. मी लवकरच हैदराबादहून मुंबईत काजलच्या लग्नासाठी येणार आहे.’
काजल अग्रवालने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लवकरच लग्न करत असल्याची घोषणा केली होती. याचबरोबर तिने एक खास कार्ड पोस्ट केले होते. या निमंत्रण पत्रिकेत, ‘ती 30 ऑक्टोबरला गौतम किचूलसोबत लग्न करणार असून, कोरोना संसर्ग पाहता काजलच्या लग्नाच्या कार्यक्रमांना अतिशय खासगी ठेवण्यात येणार आहे. या सोहळ्याला केवळ कुटुंबातील सदस्यांचाच सहभाग असणार आहे’, असे म्हटले होते.
आपण 2020मध्ये लग्न करणार असून, चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यक्तीशी लग्न गाठ बांधणार नसल्याचे तिने म्हटले होते. (Actress Kajal Aggarwal marriage update shifting in new house)
धमाकेदार बॅचलर पार्टी
काजलने तिची बहिण निशासोबत धमाकेदार बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. यात ती आणि बहिण दोघीही धमाल करताना दिसल्या होत्या. बहिण निशाला काजल सगळ्यात जवळची मैत्रीण मानते. दोघी एकत्र फोटो शेअर करत असतात. काजलची बहिण निशा फॅशन डिझायनर असून, त्या दोघी नेहमी एकत्र फोटोशूट करत असतात.
व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ
काजल अग्रवाल पेशाने व्यावसायिक असणाऱ्या गौतम किचलूशी विवाह करणार आहे. गौतम इंटेरीअर डिझायनर असून त्याची स्वतःची कंपनी आहे. या व्यतिरिक्त त्याला परदेशात फिरण्याची आवड आहे.
(Actress Kajal Aggarwal marriage update shifting in new house)