कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला

कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Kangana Ranaut will be home quarantine after she came in mumbai) 

कंगनाला होम क्वारंटाईन करणार, मुंबईच्या महापौरांनी नियम दाखवला
Follow us
| Updated on: Sep 07, 2020 | 7:06 PM

मुंबई : “अभिनेत्री कंगना रनौत ही येत्या 9 सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी तिला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जाईल,” अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. “परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केलं जातं. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केलं जाईल,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (Kangana Ranaut will be home quarantine said Mayor Kishori Pednekar)

“येत्या बुधवारी (9 सप्टेंबर) कंगना रनौत ही हिमाचल प्रदेशातून मुंबईत येणार आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्या व्यक्तीला नियमानुसार होम क्वारंटाईन केले जाते. त्यामुळे नियमानुसार कंगनाच्या हातावरही विमानतळावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.”

ICMR च्या मार्गदर्शक प्रणालीनुसार, परराज्याततून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचे नियम आहेत. मी प्रशासनाकडून माहिती घेतली. आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा – Kangana Ranaut | हिमाचल प्रदेश सरकारकडून कंगनाला सुरक्षा, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची माहिती

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना रनौतला Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.

दरम्यान याआधी कंगनाने “मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात ट्विटरवरुन आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. (Kangana Ranaut will be home quarantine said Mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

कंगनाच्या मदतीला केंद्र सरकार, Y+ दर्जाची सुरक्षा, कंगनाकडून अमित शाहांचे आभार

मुंबई, मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह बोलणारे कोणीही असो, आमच्यातलेही, तरी माफी मागावीच लागेल : संजय राऊत

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.