Nushrat Bharucha | ‘छलांग’ यशानंतर नुसरत भरूचा मध्यप्रदेशात, पीपीई कीट परिधान करून ‘छोरी’च्या चित्रीकरणाला सुरुवात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्यती सगळी काळजी घेऊन चित्रीकरण करण्यात येत आहे. नुकतेच याचे फोटो नुसरतने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nushrat Bharucha | 'छलांग' यशानंतर नुसरत भरूचा मध्यप्रदेशात, पीपीई कीट परिधान करून ‘छोरी’च्या चित्रीकरणाला सुरुवात!
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 12:28 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Actress Nushrat Bharucha) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मध्यप्रदेशमध्ये गेली आहे. तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे. ऐन कोव्हिड काळात, मे महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण होशंगाबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्यती सगळी काळजी घेऊन चित्रीकरण करण्यात येत आहे. नुकतेच याचे फोटो नुसरतने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Actress Nushrat Bharucha Started Upcoming film shooting in Madhya Pradesh).

या फोटोंमध्ये चित्रिकरणादरम्यान मुहूर्त पूजा करण्यात आली असल्याचे दिसते आहे. तिथे कलाकार आणि क्रू मेंबर्स देखील उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मास्क आणि पीपीई कीट परिधान केला होता. डिसेंबरपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण मध्यप्रदेशात चालणार आहे. तर, अखेरचा स्लॉटमुंबईमध्ये चित्रित केला जाणार आहे. चित्रपटाच्या काही भाग हा ऊसाच्या दाट फडातील असून, ग्रामीण भागांतील दृश्यांवर अधिक काम करण्यात आले  आहे. सेटवर कोरोना संबंधित सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर सेटवर सर्व सेफ्टी मेजरची व्यवस्था करण्यात आली आहे. पीपीटी कीट आणि मास्कसह टीम संपूर्ण चित्रीकरणासाठी सज्ज झाली आहे.

शासकीय नियमांनुसार कलाकारांचे विलगीकरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण करताना शक्यती सगळी काळजी घेतली जात आहे. शासकीय नियमांनुसार कलाकारांसह संपूर्ण टीमला 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टिममधील लोकांना 14 दिवसांच्या विलगीकरणासाठी स्वतंत्र घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘छोरी’ हा चित्रपटाची कथा हॉरर जॉनरवर आधारित असून, या चित्रपटातून सामाजिक संदेश देखील देण्यात येणार आहे (Actress Nushrat Bharucha Started Upcoming film shooting in Madhya Pradesh).

नुसरत भरुचासह या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्याही मुख्य भूमिका आहे. नुसरतचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘छलांग’ सुपरहिट ठरला आहे. त्यामुळे हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कपिल शर्मासह धमाल

‘द कपिल शर्मा शो’मध्ये राजकुमार राव आणि नुसरत भरुचा काही दिवसांपूर्वी सहभागी झाले होते.  दोघेही त्यांच्या ‘छलांग’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आले होते. कपिल शर्माने राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे स्वागत केले होते. यावेळी कपिल नुसरतबरोबर फ्लर्ट करताना दिसला होता. या भागामध्ये सर्वात मजेदार म्हणजे राजकुमार भारतीला उचलून डान्स करत होता. ‘छलांग’ या चित्रपटात सतीश कौशिक, झीशान अयूब यांच्यासह अनेक कलाकार राजकुमार आणि नुसरतसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. ‘छलांग’ चित्रपटाचे दिग्दर्शन हंसत मेहता यांनी केले आहे.

(Actress Nushrat Bharucha Started Upcoming film shooting in Madhya Pradesh)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.