PHOTO | ‘बिग बॉस’च्या घरात अॅडल्ट शो स्टार सपना भाभीचीही एन्ट्री; सदस्य टेन्शनमध्ये
अभिनेत्री सनी लिओनीनंतर आता बिग बॉसच्या घरात आणखी एका अॅडल्ट शो स्टारची एन्ट्री होणार आहे. (Actress Sapna Sappu likely to enter Bigg Boss 14)
Follow us
‘बिग बॉस’चे 14 वे पर्व दणक्यात सुरू झाले आहे. अभिनेत्री सनी लिओनीनंतर आता बिग बॉसच्या घरात आणखी एका अॅडल्ट शो स्टारची एन्ट्री होणार आहे.
अॅडल्ट शो स्टार आणि अभिनेत्री सपना सप्पू असे बिग बॉसच्या घरात येणाऱ्या सदस्याचे नाव आहे. सपना सप्पू हिला सपना भाभी या नावाने ओळखले जाते.
येत्या आठवड्यात सपना वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसमध्ये दाखल होऊ शकते.
सपना भाभीची लोकप्रियता आणि तिची फॅन फॉलोइंग पाहता तिच्या आगमनामुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यही टेन्शनमध्ये आले आहेत.
सपनाने आपल्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये सुपरस्टार मिथुन चक्रवर्तीसोबत गुंडा या चित्रपटातून केली होती. मात्र त्यानंतर तिने बी- ग्रेड चित्रपटात काम करणं सुरु केले.
गेल्या 20 वर्षात तिने हिंदी, भोजपुरी आणि गुजराती अशा एकत्रित 200 चित्रपटात काम केले आहे.
लग्नानंतर ती अभिनय क्षेत्राला अलविदा करत गुजरातला स्थायिक झाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी तिने एका अॅडल्ट शोद्वारे कमबॅक केलं होतं.
सपनाला एक मुलगा असून ती पतीपासून वेगळी राहते. सध्या ती मुंबईत असून तिने सेमी अॅडल्ट शोमध्ये काम केले आहे.
ती तिच्या मुलाची जबाबदारी एकटी सांभाळत असून मुलाच्या कस्टडीसाठी न्यायलयीन लढाई लढत आहे.
सपनाने अनेक बोल्ड सीन, अॅडल्ट शो केले आहेत.
सपनाच्या प्रसिद्ध सपना भाभी या वेब सीरिजचे चार शो आले आहे.