अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात, मुलीच्या विनयभंगाचा आरोप

'कसौटी जिंदगी की' मालिका फेम अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या पहिल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. अभिनव गोहीलने आपल्या मुलीला अश्लाघ्य फोटो दाखवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप श्वेताने केला आहे

अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात, मुलीच्या विनयभंगाचा आरोप
Follow us
| Updated on: Aug 12, 2019 | 7:44 AM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) आपल्या दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. अश्लील फोटो दाखवून अभिनव गोहील आपल्या मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप श्वेताने केला आहे. मुंबईतील समतानगर पोलिसांनी 38 वर्षीय अभिनव गोहीलला अटक केली आहे.

पती अभिनव ऑक्टोबर 2017 पासून आपली मुलगी पलक हिला मॉडेलचे अश्लील फोटो दाखवतो. त्याचप्रमाणे तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो, असा दावा श्वेताने केला आहे. पलक ही श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी, म्हणजेच अभिनवची सावत्र मुलगी आहे.

अभिनवला काल दुपारी समतानगर पोलिस स्टेशनला आणण्यात आलं. चार तासांच्या चौकशीनंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्वेता तिवारीने 2001 साली ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून करिअरला सुरुवात केली. ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाची ती विजेतीही ठरली होती. याशिवाय अनेक मालिका, रिअॅलिटी शो आणि चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

श्वेता तिवारीने नऊ वर्षांच्या संसारानंतर 2007 मध्ये पहिला पती राजा चौधरीसोबत घटस्फोट घेतला होता. दारुच्या नशेत राजा मारहाण करत असल्याचं श्वेता सांगत असे.

2010 पासून श्वेता अभिनवला डेट करत होती. 2013 मध्ये श्वेता आणि अभिनव विवाहबंधनात अडकले. नोव्हेंबर 2016 मध्ये श्वेता आणि अभिनव यांना मुलगा झाला. गेल्या वर्षभरापासून दोघांच्या नात्यात वितुष्ट आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याविषयी दोघांनीही जाहीर बोलणं टाळलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.