Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पती अभिनव कोहली पोलीस ठाण्यात, एकमेकांविरोधात तक्रार

श्वेता आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचे म्हणत, अभिनवने तक्रार दाखल केली आहे.

Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पती अभिनव कोहली पोलीस ठाण्यात, एकमेकांविरोधात तक्रार
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:50 PM

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) पती अभिनव कोहली (Abhinav Kohli) विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मंगळवारी समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तर, श्वेता निघून गेल्यावर काही वेळातच तिचा पती अभिनेता अभिनव कोहली देखील समता नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. श्वेता आणि अभिनवला 4 वर्षांचा मुलगा असून, त्याचा सांभाळ करण्यावरून पती-पत्नीमध्ये खडाजंगी सुरू आहे (Actress Shweta Tiwari and husband Abhinav Kohli files complaint aginst each other).

मागील काही काळापासून श्वेता आणि अभिनव यांचे नाते तुटल्याने ते दोघेही सध्या वेगेळे राहत आहेत. तर, श्वेता आपल्याला मुलाला भेटू देत नसल्याचे म्हणत, अभिनवने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने मुलाची कस्टडी आपल्याकडे देण्यात यावी अशी मागणी केली आहे. श्वेता आणि अभिनवचा मुलगा सध्या श्वेताकडे असून, ती अभिनवला त्याला भेटू देत नसल्याने, अभिनव संतापला आहे.

श्वेताच्या जाहिराती विरोधातही तक्रार

अभिनव कोहलीने श्वेता विरोधात आणखी एका तक्रार नोंदवली आहे. नुकतीच श्वेताने एक लहान मुलांसाठीच्या शाम्पूची जाहिरात चित्रित केली आहे. हा शाम्पू लहान मुलांसाठी घातक असल्याचा दावा अभिनवने केला आहे. यासंदर्भातही त्याने लिखित तक्रार दिली आहे.

तसेच, आतापर्यंत आपणच मुलाचा सांभाळ केला आहे. त्यामुळे मुलाचा ताबा आपल्याकडेच देण्यात यावा, अशी मागणी अभिनवने केली आहे. याआधी श्वेता चित्रीकरणासाठी बाहेर असल्याने अभिनवने त्यांच्या मुलाला सांभाळले आहे (Actress Shweta Tiwari and husband Abhinav Kohli files complaint aginst each other).

श्वेताने मुलाला हिसकावले : अभिनव कोहली

तक्रार नोंदवतेवेळी अभिनवने म्हटले की, 20 सप्टेंबरला श्वेताला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी देखील आमच्या मुलाचा सांभाळ मीच केला होता. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी अचानक येऊन श्वेता मुलाला घेऊन निघून गेली. या दिवसानंतर ती आम्हाला भेटूही देत नाहीय. आजही ती मुलाला घेऊन आली होती. मात्र, मला भेटू दिले नाही की बोलूही दिले नाही.

‘मला नेहमीच वाटते की, मुलाने आई-वडील दोघांसोबत राहिले पाहिजे. मुलाला आई-वडील दोघांचे प्रेम मिळाले पाहिजे. मुलाला ज्याच्याकडे राहावे वाटेल, त्याच्याकडे राहू दिले पाहिजे. जेव्हाही आमच्या मुलाला आमची गरज असेल, तेव्हा आम्ही एकत्र असलो पाहिजे. आमच्यातील वादामुळे मुलांना त्रास होता कामा नये’, असे अभिनवने म्हटले.

तर, दुसरीकडे अभिनवने मुलाला भेटू नये म्हणून श्वेता तिवारीने देखील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या आधी श्वेता तिवारीने मुलगी पालक तिवारीला त्रास दिल्याबद्दल अभिनव कोहली विरोधात तक्रार दाखल करत, त्याच्यापासून वेगेळे राहण्याचा निर्णय घेतला होता.

(Actress Shweta Tiwari and husband Abhinav Kohli files complaint aginst each other)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.