Aditya Narayan | ठरलं! डिसेंबरमध्ये आदित्य बोहल्यावर चढणार, लग्नाच्या तयारीसाठी सोशल मीडियावरून ‘ब्रेक’!
खुद्द आदित्यने आपण डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढणार असल्याची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) त्याच्या लग्नाची घोषणा करत सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आदित्य नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता खुद्द आदित्यने आपण डिसेंबरमध्ये बोहल्यावर चढणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मैत्रीण श्वेता अग्रवालशी (Shweta Agarwal) लग्न करण्याचा मुहूर्त सांगत त्याने लग्नाच्या तयारीसाठी चक्क सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.(Aditya Narayan announce wedding date with Shweta Agarwal)
यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने माहिती दिली आहे. आदित्य नारायण याने श्वेतासोबतचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यात आदित्यने लिहिले की, ‘आमचे लग्न होत आहे. मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगा आहे. मला 11 वर्षापूर्वी माझी सोलमेट श्वेता मिळाली आणि आम्ही डिसेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहोत. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत. एखाद्या व्यक्तीचे खासगी जीवन, खासगी ठेवले पाहिजे, असे आम्हाला दोघांनाही वाटते आहे. म्हणूनच लग्नाच्या तयारीसाठी मी सोशल मीडियावरून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये भेटू.’ आदित्यच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
10 वर्षांचे नाते!
आदित्य नारायण त्याची सह-अभिनेत्री श्वेता अग्रवालशी (Shweta Agarwal) विवाह बंधनात अडकणार आहे. श्वेताने आदित्यसोबत ‘शापित’ या चित्रपटात काम केले होते. 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या सेटवरच आदित्य आणि श्वेताची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता 10 वर्षांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. (Aditya Narayan announce wedding date with Shweta Agarwal)
नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आदित्यने आपल्या प्रेमाची कबुली देत, लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, ‘शापितच्या सेटवर माझी आणि श्वेताची भेट झाली होती. पहिल्याच भेटीत आमची छान मैत्री झाली होती. मात्र, काही काळाने आपण तिच्यावर प्रेम करू लागलो आहोत, याची जाणीव मला झाली. मी तिला याबद्दल कल्पनादेखील दिली होती. मात्र, त्यावेळी आम्ही दोघेही करिअरमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याने, प्रेमाऐवजी मैत्रीच्या नात्याला अधिक प्राधान्य दिले.’
आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले
तब्बल 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेण्याविषयी बोलताना आदित्य (Aditya Narayan) म्हणाला, ‘प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्या न्यात्यानेही गेल्या 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. या सगळ्यात आम्ही एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे. लग्न ही केवळ फॉर्मेलिटी आहे. या वर्षाअखेरीस आम्ही लग्न करणार आहोत. आई-वडिलांनाही श्वेताबद्द्ल माहिती आहे. त्या दोघांनाही ती खूप आवडते. इतक्या छान जोडीदारामुळे मी देखील खूप खुश आहे.’
(Aditya Narayan announce wedding date with Shweta Agarwal)
Prajakta Gaikwad | अलकाताई आईसारख्या, मात्र नराधमाची पाठराखण, प्राजक्ता गायकवाडचे धक्कादायक आरोपhttps://t.co/19ANzgUTYK@its_Prajaktaa #AaiMajhiKalubai #AlkaKubal
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020