पर्यावरण मंत्रालयाचे नाव सर्वसमावेशक करण्याचा प्रस्ताव, पर्यावरण दिनी मंत्री आदित्य ठाकरेंचा मानस

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

पर्यावरण मंत्रालयाचे नाव सर्वसमावेशक करण्याचा प्रस्ताव, पर्यावरण दिनी मंत्री आदित्य ठाकरेंचा मानस
Follow us
| Updated on: Jun 05, 2020 | 3:15 PM

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता “पर्यावरण व वातावरणीय बदल” विभाग असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर लवकरच हा बदल करण्यात येईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा मानस बोलून दाखवला. (Aditya Thackeray on proposal of changing the name of Environment Ministry)

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर कार्य करेल, अशी घोषणा आदित्य ठाकरे आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून केली.

विभागातील नावाच्या बदलासह विभागाचे ध्येय व उद्दिष्टे अधिक व्यापक करत त्यात सध्याच्या वातावरणातील बदल व त्या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांचा अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे आणि बनसोडे यांनी दिली.

युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्रामने (UNEP) “जागतिक पर्यावरण दिन 2020” ची संकल्पना “Time For Nature” अशी निश्चित केली असून त्या अनुषंगाने विभागाने राज्य शासनाच्या इतर संबंधित विभागांसह वातावरणीय बदलांबाबत उपाययोजना करत निसर्गपूरक जीवन पद्धतीसाठी कृती आराखडे तयार केले आहेत. राज्य शासनाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी यावर्षी या विभागामार्फत 100 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मंत्री श्री. ठाकरे व राज्यमंत्री श्री. बनसोडे यांनी जाहीर केले.

हेही वाचा : रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग हा निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश पंचतत्वांवर कार्य करेल. पृथ्वी तत्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमीनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर हा विभाग कार्य करेल. हवेच्या गुणवत्तेसाठी हा विभाग उद्योग, परिवहन व इतर विभागांना सहकार्य करुन वायूप्रदूषण कमी करुन महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता सुधारेल व वायू तत्वाचे संरक्षण करेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

जल तत्वाशी संबंधित नदी संवर्धनाच्या सद्यस्थितीत सुरु कामांसह सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. अग्नी तत्वाशी संबंधीत ऊर्जा स्त्रोत म्हणून अन्य विभागांसह कार्य करत उर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच उर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देत, अपारंपारीक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडिक जमिनी, शेतांचे बांध यासारख्या जागांवर राबवले जाईल.

आकाशाच्या विविध संकल्पनांपैकी हा विभाग आकाश या तत्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात आपल्या कृतीद्वारे आपला भवताल अधिक समृद्ध करण्यासाठी प्रवृत्त करेल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले. (Aditya Thackeray on proposal of changing the name of Environment Ministry)

जागतिक पर्यावरण दिनाचे सर्व कार्यक्रम आपण करत नसलो तरी सद्यस्थितीत हीच निसर्गास वेळ देण्याची आहे. यासाठी राज्यातील इतर विभाग, इतर राज्ये, केंद्र, अशासकीय संस्था, पर्यावरणवादी आणि राज्यातील प्रत्येक नागरीक यांसह एकत्रितपणे कार्य करण्याची आमची इच्छा आहे. आपल्या पासूनच बदल सुरु होतो, असे आवाहनही आदित्य ठाकरे आणि संजय बनसोडे यांनी केले.

(Aditya Thackeray on proposal of changing the name of Environment Ministry)

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.