पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त

पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाने 2 हजार 160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी, तर 423 निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, 2160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी नियुक्त
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 11:19 AM

पुणे : पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक (Pune graduate and teacher constituency elections) प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक प्रक्रीयेसाठी विभागात 2 हजार 160 मतदान कर्मचारी, 856 आरोग्य कर्मचारी, तर 423 निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत, कोरोनाच्या (Corona Pandemic) पार्श्वभूमीवर मास्क्स, थर्मल स्कॅनिंग आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दष्टीने सर्व प्रकारची साधनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. आज (30 नोव्हेंबर) रात्री 12 नंतर मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले जाणार आहेत. (Administration ready for Pune graduate and teacher constituency elections, 2160 polling staff, 856 health staff appointed)

निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

1. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो 2. यंदा पदवीधर मतदारसंघात 62 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, तर शिक्षक मतदारसंघात एकूण 35 उमेदवार उभे आहेत. 3. पुणे जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 1 लाख 36 हजार 611 इतकी आहे, तर शिक्षक मतदारसंख्या 32 हजार 201 इतकी आहे. 4. पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी एकूण 232 मतदानाची केंद्रं तयार करण्यात आली आहेत, तर शिक्षक मतदानासाठी 125 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 5. मतदार याद्यांमधील नावातील घोळामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता जास्त आहे, 6. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोनाचे नियम पाळून जास्तीत मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. 7. निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. परंतु बोगस मतदान रोखण्यासाठी प्रशासनाला करडी नजर ठेवावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र ही हवेली तालुक्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 15 किलोमीटरची हद्द लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

मद्यविक्री बंद; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या (graduate and teachers constituency elections) पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या रविवारपासून चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि बार बंद करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (collector Dr Rajesh Deshmukh) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुणे शहरात 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 आणि 3 डिसेंबरला ड्राय डे असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे बाबत आदेश दिले आहेत.

मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजेच 29 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापासून मद्याची दुकाने आणि बार बंद करण्यात आली आहेत. तर 1 डिसेंबरला मतदान असून सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर ती उघडतील. त्यानंतर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यादिवशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि बार बंद राहतील.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम राबवल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यांदाच्या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतलेली पाहायला मिळत आहे. कारण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे.

मतदान केंद्रावर आता वैद्यकीय अधिकारी!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. 1 डिसेंबरला राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक दोन दिवस आधी मतदार पॉझिटिव्ह आला तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसंच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेमुळे तिरंगी लढत

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्यानं मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. यावेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार

अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्राम देशमुख (भाजप) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)

संबंधित बातम्या:

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

पुणे पदवीधरचे चित्र स्पष्ट, राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यात मुख्य लढत, 62 उमेदवार रिंगणात

पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार, तर खोतांचा सन्मान राखण्याची चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

पुणे पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर आता वैद्यकीय अधिकारी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.