Asia Cup 2022 : रोमांचक सामन्यात पाकिस्तानकडून अफगाणिस्तानचा पराभव
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानची धावसंख्या कमी असल्याने ते कशी गोलंदाजी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
बुधवारी रात्री पाकिस्तान (Pakitan) आणि अफगाणिस्तान (Afganistan) यांच्यात रोमांचक सामना झाला. हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत चाललो होता. सामन्यात कुणाच्या पारड्यात जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पाकिस्तानच्या खेळाडूने आपली उत्तम कामगिरी केल्याने पाकिस्तानने हा सामना जिंकला. आशिया चषकातील (Asia Cup 2022) अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया आशिया चषकातून बाहेर गेला आहे. त्यामुळे भारतीय संघाला औपचारिकता म्हणून एक सामना खेळावा लागणार आहे.
Don’t cry boys, in low-score match you made your opponent cry like hell. What a fight back guys ??? Win or lose is part of game but Afghanistan boys won heart❤️#AFGvPAK pic.twitter.com/ReoxwEu7IJ
हे सुद्धा वाचा— Abhishek R. Rai (@RealAbhishekRai) September 7, 2022
कालच्या सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर खेळाडूंनी मैदानात जोरदार उत्साह साजरा केला. त्याचवेळी अफगानिस्तानच्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी दिसले. सोशल मीडियावर अनेक खेळाडू रडत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये अफगानिस्तान जिंकेल अशी स्थिती होती.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 130 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानची धावसंख्या कमी असल्याने ते कशी गोलंदाजी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आणि सामना आपल्या पारड्यात खेचून आणला होता. झालेल्या पराभवासह अफगाणिस्तान आशिया कप 2022 मधून बाहेर पडला आहे.
अफगाणिस्तानने 20 षटकांत 6 बाद 129 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने हे लक्ष्य चार चेंडू शिल्लक असताना 9 गडी गमावून पूर्ण केले. पाकिस्तानकडून इफ्तिखार अहमदने 30, मोहम्मद रिझवानने 20 आणि शादाब खानने 36 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयी झाला. अफगाणिस्तान संघाकडून ब्राहिम झद्रानने 37 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.