इम्रान खानची भारताला धमकी, अफगाणी नागरिकांनी पाकची अब्रू काढली
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गेल्या 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. जैश-ए-मोहम्मद या संघटनेची पाळ-मुळं पाकिस्तानात रुजलेली आहेत. या हल्ल्याच्या पाच दिवसांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, भारत हल्ला करेल तर पाकिस्तानही शांत बसणार नाही. पंतप्रधान इम्रान […]
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गेल्या 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली. जैश-ए-मोहम्मद या संघटनेची पाळ-मुळं पाकिस्तानात रुजलेली आहेत. या हल्ल्याच्या पाच दिवसांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, भारत हल्ला करेल तर पाकिस्तानही शांत बसणार नाही. पंतप्रधान इम्रान खान यांच्या या वक्तव्यावरुन अफगाणिस्तानच्या लोकांनी इम्रान खान यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
VIDEO :
युट्यूबवर यासंबंधी एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये एक अफगाणी नागरिक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खिल्ली उडवताना दिसतो आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, “जर तुम्ही पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तान ते सहन करणार नाही, तो उत्तर देईल.”
या व्हिडीमध्ये अफगाणी नागरिकाने पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. “तुम्ही स्वत:ची तुलना भारताशी करु नका. भारत कुठे आणि तुम्ही कुठे? भारत दरवर्षी 10 हजार इंजीनियर आणि सहा हजार डॉक्टर तयार करतो. पाकिस्तानात काय बनतं? 15 हजार आत्मगाती दहशतवादी, त्यांना अफगाणिस्तानात पाठवा! तुमच्याजवळ अक्कल नाही, इस्लाम नाही, तुमचा देश एक अमानुष देश आहे. या देशाच्या पंतप्रधानांचीसुद्धा विमानतळावर तपासणी होते.”
“दहशतवादावर खर्च होणारे पैसे आपल्या देशातील गरीब जनतेवर खर्च करा. तेव्हाच पाकिस्तान एक चांगला देश बनेल. पण, तुम्ही तर असं करुच शकत नाही. कारण तुम्ही सैतान आहात. सैतानाच्या डोक्यात चांगली कामं कशी येणार?”
या व्हिडीओच्या शेवटी अफगाणी नागरिक म्हणतो, “चला येतो दहशतवाद्यांनो! प्रार्थनेत लक्षात ठेवा” अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत. यामध्ये पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांची अक्षरश: टिंगल उडवण्यात आली आहे.
VIDEO :