Arvind Kejriwal : जवळचा मित्र, आता आहे शत्रू, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्याने लिहिले केवळ दोनच शब्द
केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली. अनेक नेते आपपासून दुरावले आहेत. मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते अरविंद केजरीवाल आणि आपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यावर त्यांच्या एकेकाळच्या अत्यंत जवळच्या मित्राने केवळ दोन शब्दांची पोस्ट केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेमुळे हा जुना मित्र पण आताचा शत्रू खूपच आनंदित झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. अरविंद केजरीवाल यांचा हा पूर्वीचा मित्र आहे कपिल मिश्रा. मात्र, आता ते केजरीवाल यांचे कट्टर शत्रू झाले आहेत. केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यामुळे ते खूप खुश झालेत.
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून कपिल मिश्रा हे त्यांचे मित्र होते. केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मात्र परिस्थिती झपाट्याने बदलली. अनेक नेते आपपासून दुरावले आहेत. मिश्रा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते अरविंद केजरीवाल आणि आपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
गुरुवारी ईडीचे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा कपिल मिश्रा यांना आनंद झाला. केजरीवाल यांना अटक झाल्याचे समजताच मिश्रा यांनी केवळ दोन शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘सत्यमेव जयते’ हे दोनच शब्द लिहिले आहेत.
अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशी करत होती. त्यावेळी कपिल मिश्रा यांनी एक पोस्ट लिहिली होती. केजरीवाल यांना अटक झाल्यास दिल्लीतील लोकांना न्याय मिळेल असे त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले होते.
सत्यमेव जयते
— Kapil Mishra (Modi Ka Pariwar) (@KapilMishra_IND) March 21, 2024
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे जे लोक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला तयार होते. त्यांनाच दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर केजरीवाल पूर्णपणे बदलले आहेत असे वाटले. त्या लोकांच्या यादीत कपिल मिश्रा हे नाव अग्रणी होते. कपिल मिश्रा यांनी केवळ त्या आंदोलनात भाग घेतला. आम आदमी पार्टी (आप) ची स्थापना झाली तेव्हा केजरीवाल यांच्यासोबत त्यांची मैत्री घट्ट झाली होती. पण. नंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि मिश्रा भाजपमध्ये सामील झाले.