दहा महिन्यांनी इरफान खान मायदेशी परतला
मुंबई : अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजाराबाबत आणि उपचाराबाबत सध्या काय स्थिती आहे, याची लवकरच मी अधिकृतपणे माहिती देईन, असे इरफानने सांगितले आहे. गेल्यावर्षी 16 मार्चला सोशल मीडियावर […]
मुंबई : अभिनेता इरफान खान भारतात परतला आहे. गेल्यावर्षी इरफान न्युरोअँडोक्राइन ट्युमर या आजारावर उपचार करण्यासाठी लंडनला गेला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी इरफान उपचार पूर्ण करुन मायदेशी परतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजाराबाबत आणि उपचाराबाबत सध्या काय स्थिती आहे, याची लवकरच मी अधिकृतपणे माहिती देईन, असे इरफानने सांगितले आहे. गेल्यावर्षी 16 मार्चला सोशल मीडियावर ओपन लेटरच्या माध्यमातून इरफानने आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती.
इरफानला न्युरोअँडोक्राइन ट्युमर
इरफान खानने गेल्यावर्षी मार्च महिन्यात ट्वीट करत आपल्या आजाराबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात म्हटलं होत की, “मला न्युरोअँडोक्राइन ट्युमर आजार झाला आहे. यातून मी एक गोष्ट शिकलो की, अचानक सामोरे येणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात. मला जेव्हा कळलं मला न्युरोअँडोक्राइन ट्युमर झाला आहे, तेव्हा मला ते सहन झालं नाही. मात्र आजुबाजूच्या लोकांचे प्रेम आणि इच्छाशक्तीमुळे मला बळ मिळालं आहे. त्यामुळे उपचार घेऊन लवकरच परतेन.”
आजारपणामुळे हे चित्रपट रखडले!
इरफान खान ‘सपना दीदी’ या विशाल भारद्वाजच्या चित्रपटासाठी काम सुरु करणार होते. ज्यामध्ये त्यांच्यासोबत दीपिका पादुकोण होती. मात्र आजारपणामुळे ते शुटिंग सुरु करु शकले नाही. नुकतेच विशाल भारद्वाज यांनी सांगितले की, जेव्हा इरफान खान सुरुवात करेल तेव्हाच चित्रपटाच्या कामाला सुरवात होईल.
कोण आहे इरफान खान?
इरफान खान यांचा 7 जानेवारीला 1967 मध्ये जयपूर येथे जन्म झाला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्राममधून त्यांनी आपल्या अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले आहे. 1988 मध्ये मीरा नायर यांचा चित्रपट ‘सलाम बॉम्बे’मधून त्यांनी बॉलीवुडमध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्याच नाव नॉमिनेट करण्यात आले होते.