यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 5:12 PM

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे (Rekha Bhausaheb Jare Murder Case) यांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुपारी घेवून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. गेल्या 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती (Rekha Bhausaheb Jare Murder Case).

30 नोव्हेंबरला रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. रेखा जरे या त्यांच्या कुटुंबियांसह संध्याकाळी पुण्याहून काम उरकून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, सून, त्यांची आई देखील होते. या दरम्यान, कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. या वादातून रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली होती.

पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात ही हल्ल्याची घटना घडली होती. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसांच्या आत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींची नावं जाहीर केलेली नाहीत. रेखा जरे यांची हत्या सुपारी घेवून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Rekha Bhausaheb Jare Murder Case

संबंधित बातम्या :

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू

नितीन नांदगावकर यांच्या नावावर खंडणी, घराचा ताबा मिळवूण देण्याच्या नावाखाली दीड लाखांना गंडा

अरविंद सावंतांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाऊंटवरुन पैशांची मागणी, पोलिसांत तक्रार दाखल

अमित शाहांचा नातेवाईक असल्याची बतावणी, आमदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न फसला, भामटा ताब्यात

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.