किस करताना जीभ अडकली, नवऱ्याने बायकोची जीभच कापली

किस करताना जीभ अडकल्याने पत्नी तस्लीमची जीभ कापल्याचा दावा अहमदाबादमध्ये राहणाऱ्या 46 वर्षीय अय्युब मन्सुरीने केला आहे

किस करताना जीभ अडकली, नवऱ्याने बायकोची जीभच कापली
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 16, 2019 | 2:03 PM

अहमदाबाद : किस करताना जीभेत जीभ अडकल्यामुळे आपण आपल्या बायकोची जीभ छाटली, असा अजब दावा नवऱ्याने केला आहे. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या 46 वर्षीय अय्युब मन्सुरीने तिसरी पत्नी तस्लीमची जीभ कापली (Husband Cuts wife’s tongue). पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं आहे.

आपण पत्नी तस्लीमचं चुंबन घेत होतो. चुंबन घेताना दोघांच्या जिभा एकमेकींमध्ये अडकल्या. सुरुवातीला आम्ही गुंतलेल्या जिभा एकमेकांपासून विलग करण्याचे खूप वेळा प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरल्यामुळे पत्नीच्या जिभेची कुर्बानी दिली, असा दावा अय्युब मन्सुरीने केला. मात्र अय्युबने स्वतःची जीभ कापण्याचा पर्याय असताना पत्नीची जीभ कापल्याने पोलिसांना घटनाक्रमाविषयी संशय वाटत आहे.

गुजरातमधील जुहापुरा भागात 9 ऑक्टोबरला हा भयानक प्रसंग घडल्याची माहिती आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

अडकलेल्या जिभा सुटण्याचा कोणताच पर्याय न दिसत असल्यामुळे आपण बायकोच्या जिभेवर सुरी चालवली (Husband Cuts wife’s tongue), असा दावा अय्युबने केला आहे. पोलिसांना मात्र त्याचा अजब युक्तिवाद पटलेला नाही.

बहिणीच्या आत्महत्येने संतापलेल्या भावाकडून पोलिसांसमोरच भावजीची हत्या

बायकोची जीभ कापल्यानंतर तिला खोलीत बंद करुन अय्युबने पोबारा केला. घाबरुन आपण घरातून पळ काढल्याचं अय्युबने पोलिसांना सांगितलं. अय्युब मन्सुरीला सध्या साबरमती तुरुंगात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.

जीभ कापल्यामुळे जखमी झालेल्या तस्लीमला त्याच रात्री एलिस ब्रिजजवळच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आठवड्याभरानंतरही ती नीट बोलू किंवा खाऊ शकत नाही (Husband Cuts wife’s tongue).

शस्त्रक्रियेनंतर तस्लीमला लिक्विड डायट देण्यात येत असल्याची माहिती तिचा दीर इद्रिश मन्सुरी याने दिली आहे. तस्लीम ही अय्युब मन्सुरीची तिसरी पत्नी आहे, तर तस्लीमचंही हे दुसरं लग्न आहे. मार्च 2018 मध्ये अय्युब आणि तस्लीम यांचा निकाह झाला होता. मात्र तेव्हापासून दोघांमध्ये बरेचदा भांडणं होत असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे अय्युबने आपली पहिली पत्नी परवीन हिला जाळून मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर अय्युबने मुंबईकर तरुणीशी दुसरा विवाह केला. मात्र वादामुळे ती सोडून गेली. त्यानंतर तस्लीमसोबत त्यांने तिसरं लग्न केलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.