Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; विधानसभेआधी शरद पवारांचा आणखी एक धक्का

Vivek Kolhe May Inter in NCP Sharad Pawar Group : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीआधी शरद पवार भाजपला मोठा धक्का देणार असल्याची चर्चा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बडा नेता शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती आहे.

भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; विधानसभेआधी शरद पवारांचा आणखी एक धक्का
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 1:15 PM

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसतं आहे. शरद पवार सध्या विविध भागाचे दौरे करत आहेत. अशात भाजपचे नेते त्यांच्या भेटी घेत आहेत. तर काहीजण लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं कळतंय. अशातच आता अहमदनगरमधील बडा नेता देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातील इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. तर कोल्हापुरातील समरजित घाटगे यांचा देखील शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये देखील शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या माजी आमदार, भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विवेक कोल्हे हे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. यावेळी कोपरगाव विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आणि उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

पवार- कोल्हेंची आज भेट

अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार भाजपला धक्का देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपचा आणखी एक नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं कळतं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआय बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे एकत्र येणार आहेत. यावेळी शरद पवार आणि विवेक कोल्हे यांच्यात राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार?

विवेक कोल्हे हे कोपरगावमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्रअजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांची राजकीय अडचण झालीय. विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगाव विधानसभा मतदारमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.