WaterFall Photos : संगमनेरचा चंदनापुरी घाटातील प्रसिद्ध तामकडा धबधबा कोसळला
WaterFall Photos : संगमनेरचा चंदनापुरी घाटातील प्रसिद्ध तामकडा धबधबा कोसळला
-
-
अहमदनगर जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. संगमनेर तालुक्यात मुसळधार पावसाने नाशिक-पुणे महामार्गावरील प्रसिद्ध तामकडा धबधबा प्रवाहित झाला
-
-
या ठिकाणी डोंगरात वेढलेल्या तामकडा धरणाचं दृष्य देखील प्रवाशांना खुणावत आहे.
-
-
रस्त्याने जाताना दिसणारा हा मनमोहक धबधब्याचा नजारा पाहण्यासाठी अनेक प्रवाशांचे पाय स्थिरावताना दिसत आहेत.
-
-
अनेक प्रवासी क्षणभर विश्रांती घेत या धबधब्याचा आनंद घेत महामार्गावर थांबत आहेत.
-
-
नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात असलेलं हे नयनरम्य दृश्य अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
-
दरवर्षी हा तामकडा धबधबा जुलैच्या सुरुवातीलाच वाहतो.
-
-
यावर्षी तामकडा धबधबा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात प्रवाहित झाला.
-
-
धबधबा फेसाळल्यानंतर महामार्गावरील प्रवासी क्षणभर थांबून निसर्गाचं हे रुप डोळ्यात भरुन घेत आहेत.
-
-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येही प्रवासी प्रवासाच्या निमित्ताने महामार्गावरील या निसर्गाचा मन भरुन आनंद घेत आहेत.