Bail Pola Special Photos: नगरच्या पठ्ठ्याची कमाल, लॉकडाऊनमध्ये सागाची बैलगाडी बनवली, किंमत आली तब्बल…
Ahmednagar Bullock cart amid Lockdown
त्याने वडील अनिल आणि चुलते भारत थोरात यांच्या मदतीने या बैलगाडीचं काम सुरु केलं. बघता बघता 2 महिन्यात ही बैलगाडी पूर्णत्वास आली आहे.
Follow us
लॉकडाऊनच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात कर्जत शहरातील रणजित अनिल थोरात या तरुणाने सागाच्या लाकडापासून सुंदर अशी बैल गाडी साकारलीये.
ही बैलगाडी पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे एक लाख रुपयांपर्यंत किमतीला विकण्याची गाडीला मागणी आली आहे.
या गाडीवर बारीक कोरीव काम करण्यात आलंय. तसेच बैलांसह या गाडीवर एका शेतकऱ्याची प्रतिमा साकारण्यात आलीये. या बैलगाडीची लांबी 3 फूट, तर रुंद 2 फूट असून उंची 20 इंच आहे.
रणजित हा नगरच्या चिंतामणी आर्ट गॅलरीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून काम करतोय. मात्र कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे.
या काळात रणजीतचे देखील काम बंद पडले. त्यामुळे याकाळात नेमके काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. त्यातून त्याला बैल गाडीची कल्पना सुचली.
त्याने वडील अनिल आणि चुलते भारत थोरात यांच्या मदतीने या बैलगाडीचं काम सुरु केलं. बघता बघता 2 महिन्यात ही बैलगाडी पूर्णत्वास आली आहे.
बैलगाडी आणि त्यावर गाडी चालवणारा शेतकरी अशी ही संपूर्ण हस्तकला पाहून अनेकांनी या गाडीला मागणी केलीय. या गाडीसाठी त्याला 30 हजार रुपये खर्च आला.
बैलगाडी सोबत त्याने घोडा, हत्ती आणि कासवाची लाकडी मूर्ती देखील तयार केलीय.