राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम

मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?" असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला मशिदी उघडू, जलील यांचे अल्टिमेटम
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 8:38 AM

मुंबई : राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, असे अल्टिमेटम एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी दिले आहे. औरंगाबादचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला इशारा दिला. (AIMIM Aurangabad MP imtiaz jaleel gives ultimatum to Maharashtra govt to open all Mandir Masjids)

“जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे. (AIMIM Aurangabad MP imtiaz jaleel gives ultimatum to Maharashtra govt to open all Mandir Masjids)

संबंधित बातमी :

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

(AIMIM Aurangabad MP imtiaz jaleel gives ultimatum to Maharashtra govt to open all Mandir Masjids)

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.