लेझर गाईडेड बॉम्ब, मिराज विमान, या पाच शस्त्रांनी पाकिस्तानवर हल्लाबोल

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय […]

लेझर गाईडेड बॉम्ब, मिराज विमान, या पाच शस्त्रांनी पाकिस्तानवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. यामुळे पाकिस्तनवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भारतातील जनतेकडून करण्यात येत होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बेधडक असे उत्तर दिलं. आज पहाटे 3.30 वाजता भारतीय वायुसेनेने PoK मध्ये एअर स्ट्राईक केली. हा हल्ला दहशतवादी संघटनांच्या लाँचवर करण्यात आला.

भारतीय वायुसेनेतील सूत्रांच्या मते, पहाटे साडे तीन वाजता दहशतवाद्यांच्या तळावर आणि लाँच पॅडवर एअर स्ट्राईक करण्यात आली. वायुसेनेच्या मिराज 2000 सह इतर लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवाद्यांच्या तळावर एक हजार किलो बॉम्ब टाकले.

एअर स्ट्राईक कशी घडली?

12 मिराज 2000 विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वालियर एअर बेसहून उड्डाण घेतली.

सर्व विमानांमध्ये 500 / 1000lb लेजर-गाईडेड बॉम्ब तैनात करण्यात आले होते.

मिराज 2000 जेट्समध्ये इस्रायली लायटिंग टार्गेटिंग पॅड आहेत.

भारतीय वायुसेनेच्या एका विमानाने भटिंडाहून उड्डाण घेतली.

मध्येच इंधनाची गरज लागली तर खबरदारीचा उपाय म्हणून एअर रिफ्युलिंग टँकरनेही आग्राहून उड्डाण घेतली.

हवेत निगराणीसाठी भारतीय वायुसेनेच्या हेरॉन टीमनेही साथ दिली.

मिराज 2000 विमानांनी जिथे बॉम्ब टाकायचाय, त्या ठिकाणांचा अखेरचा अंदाज घेतला.

यानंतर कमांड सेंटरहून पुढे जाण्याची सूचना मिळाली.

मिराज 2000 विमाने एलओसीवर अत्यंत कमी उंचीवर होती.

मिराज 2000 विमानांनी लेझर पॉड्सचा वापर करुन लक्ष्य निश्चित केलं.

अखेर मिराजमधून एक हजार किलो बॉम्ब सोडण्यात आले.

या ठिकाणांवरही होती नजर

भारतीय गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 13 लाँच पॅडची माहिती मिळालेली होती. हवाई हल्ल्यात बालाकोटमधील दहशतवाद्यांचा लाँच पॅड उद्ध्वस्त करण्यात आला. ही सर्व ठिकाणं जैश ए मोहम्मदकडून चालवली जात होती. पीओकेमधील Kel, shardi, dudhmial, athmuqam, jura, leepa, pcciban chamm, Fwd kathua, katli, lanjote, nikial, khuiretta, mandhar या ठिकाणी दहशतवाद्यांचे 13 कॅम्प असल्याचं बोललं जातं.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.