बजेट मांडताना अजित पवारांकडून गडकरींचे कौतुक, फडणवीसांनी बाक वाजवला

केंद्रीय रस्ते निधीमधून राज्याला 1200 कोटी रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. त्याबद्दल मी नितीन गडकरी यांचं अभिनंदन करतो, असं अजित पवार म्हणाले Ajit Pawar Praises Nitin Gadkari during Budget

बजेट मांडताना अजित पवारांकडून गडकरींचे कौतुक, फडणवीसांनी बाक वाजवला
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 1:57 PM

मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानत कौतुक केलं. आपल्या पक्षाच्या नेत्याचं अवचित झालेलं कौतुक ऐकून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आमदारांनीही बाकं वाजवून स्वागत केलं. (Ajit Pawar Praises Nitin Gadkari during Budget)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी बैठक झाली. केंद्रीय रस्ते निधीमधून राज्याला 1200 कोटी रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे. त्याबद्दल मी नितीन गडकरी यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या या मदतीचा राज्याला निश्चितच फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्ती केली. कोकणचा विकास आमच्या सरकारसाठी प्राधान्यावर आहे, रस्त्यांच्या विकासाचं काम आम्ही करणार असल्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिलं.

पुण्यातील रिंग रोडची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्यासाठी खर्च करावी, रस्ते उभारणीचा खर्च केंद्र सरकार करेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. याबद्दल मी नितीन गडकरी यांचं महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने अभिनंदन आणि कौतुक करतो, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar Praises Nitin Gadkari during Budget)

नाशिक, औरंगबाद, हैदराबाद, बंगळुरु आणि मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेरुन वळवण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह एकूण 15 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर्षी भूसंपादन सुरु करुन येत्या चार वर्षांत हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अर्थसंकल्पाशी संबंधित बातम्या :

ज्यासाठी अर्थसंकल्प मांडतात, तेच नव्हते, देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाची ‘सोप्या भाषेत’ चिरफाड

Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा

BUDGET 2020 : आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, बाकं वाजवून अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Budget 2020 : वाहनचालकांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग

2 लाखांवर कर्ज असणाऱ्यांनाही दिलासा देणार, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी : अजित पवार

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन

Ajit Pawar Praises Nitin Gadkari during Budget

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.