आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली : अजित पवार

आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल पण, आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, असं अजित पवार म्हणाले.

आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली : अजित पवार
Follow us
| Updated on: Feb 10, 2020 | 11:00 AM

मुंबई : हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar on Hinganghat Burn Victim Teacher Death) यांनीही या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल पण, आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Hinganghat Burn Victim Teacher Death)

हिंगणघाटमध्ये जळीतकांडात जखमी झालेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज अपयशी(Hinganghat Burn Victim Teacher Death)  ठरली. आज सकाळी पीडित तरुणीचा (Hinganghat Burn Victim Teacher Death) मृत्यू झाला.

अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

“हिंगणघाटमधल्या बहिणीला  नराधमाच्या हल्ल्यापासून आणि नंतर मृत्यूपासून आपण वाचवू शकलो नाही, ही महाराष्ट्राच्या मातीसाठी लाजीरवाणी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील व गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे काम करेल. समाजानेही महिलांच्या सन्मानाप्रती जागरूक राहिलं पाहिजे. या घटनेतील आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरच मिळेल आणि ती इतरांवर जरब बसवणारी असेल. आपल्या घरात असा नराधम निर्माण होऊ न देणे हीच हिंगणघाट हल्यातील मृत बहिणीला आपली आदरांजली असेल. मी तिच्या कुटुंबियांच्या आणि हिंगणघाट वसियांच्या दुःखात सहभागी आहे”,  असं अजित पवार, म्हणाले.

पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील 24 वर्षीय पीडित शिक्षिकेचा उपचारादरम्यान मृत्यू (Hinganghat Burn Victim Teacher Death) झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने पहाटे तरुणीची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज सकाळी (10 फेब्रुवारी) सहा वाजून 55 मिनिटांनी तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूनंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकिकडे आरोपी विक्की नगराळे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राजकीय नेते पीडितेच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करत आहेत (Hinganghat Teacher Death).

पीडितेला औषधं देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल संपूर्ण रात्रभर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते. संसर्गामुळे तिच्या रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं होतं. त्यामुळे मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. ‘सेप्टीसेमिक शॉक’ असं तिच्या मृत्यूचं वैद्यकीय परिभाषेतील कारण डॉक्टरांनी सांगितलं.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

संबंधित बातम्या 

हिंगणघाट जळीतकांड : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी, उज्ज्वल निकमांचंही काम सुरु : गृहमंत्री

आरोपीला लोकांमध्ये सोडा, तरच मुलीच्या आत्म्याला शांती, हिंगणघाट पीडितेच्या वडिलांचा आकांत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.