श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणारा तरुण ताब्यात
श्रीनगर: जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकाली दलाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा कार्यकर्ता पंजाबवरुन श्रीनगरला आला होता. लाल चौकात तो तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. हा कार्यकर्त्या लाल चौकातील घंटा घरावर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. अकाली […]
श्रीनगर: जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकाली दलाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा कार्यकर्ता पंजाबवरुन श्रीनगरला आला होता. लाल चौकात तो तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
हा कार्यकर्त्या लाल चौकातील घंटा घरावर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.
अकाली दलाचा हा कार्यकर्ता पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी आला होता. मात्र लाल चौक हा श्रीनगरमधील सर्वात संवेदनशील परिसर आहे. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. थोड्यावेळाने त्याला सोडून देण्यात आलं.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर काश्मीरसह देशभरात तणाव आहे. त्याच पार्श्वभूमीवर लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
VIDEO: