अकोल्यातील मूर्तिजापुरात रेल्वे कार्यालयाला आग, निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड जळाले
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नॅरोगेज रेल्वेच्या कार्यालयाला सकाळी भीषण आग (Akola Railway Office fire) लागली.
अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नॅरोगेज रेल्वेच्या कार्यालयाला सकाळी भीषण आग (Akola Railway Office fire) लागली. या आगीत संपूर्ण कार्यालय भस्मसात झाले. त्यामुळे गेल्या 8 ते 10 वर्षापासूनचे अनेक कार्यालयीन रेकॉर्ड जळाले. यात निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचेही रेकॉर्ड होते.
अकोला जिल्हातील मूर्तिजापूरमध्ये इंग्रज काळापासून सुरू असलेली नॅरोगेज (शकुंतला) ही (Akola Railway Office fire) रेल्वे मूर्तिजापूर ते यवतमाळ आणि मूर्तिजापूर ते अचलपूर अशी धावायची. पण गेल्या 3 ते 4 वर्षांपासून बंद पडली होती. मात्र आज सकाळच्या सुमारास रेल्वे लाईनच्या कर्मचाऱ्यांचे सिनियर सेक्शन कार्यालय ब्रॉडगेज लाईनवरील एका कार्यालयाला आग लागली. त्यानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.
मात्र तोपर्यंत कार्यालयातील 14 कर्मचाऱ्यांसह बऱ्याच सेवानिवृत्तीच्या वाटेवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे रेकॉर्ड आगीत जळून खाक झाले. या कार्यालयात दोन कॉम्प्युटर, फर्निचर, तसेच 8 ते 10 वर्षांचे रेकॉर्ड आगीत जळून खाक झाले.
यामुळे आता सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध फंड, सेवानिवृत्ती वेतन, त्यांना देय असलेल्या निधी अशा प्रकारच्या विविध अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत (Akola Railway Office fire) नाही.
संबंधित बातम्या :
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर, ‘या’ शंभर ट्रेन एक जूनपासून धावणार
Non AC Train | 1 जूनपासून वेळापत्रकानुसार 200 नॉन AC रेल्वे सुरु, रेल्वे मंत्र्यांची घोषणा