अकोला ZP निकाल : भारिप सर्वात मोठा पक्ष, प्रकाश आंबेडकरांना गड राखण्यात यश
गेल्या 20 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या भारिप बहुजन महासंघाने (वंचित) यावेळी सुद्धा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे.
अकोला : अकोला जिल्हा परिषदेचे निकाल जाहीर झाले (Akola ZP election result) आहेत. गेल्या 20 वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या भारिप बहुजन महासंघाने (वंचित) यावेळी सुद्धा सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. तर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला (Akola ZP election result) आहे.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. अकोल्यात अनेक बोलणी करून सुद्धा महाविकास आघाडी स्थापन होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि भारिप बहुजन महासंघ हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणूक लढले. भारिप बहुजन महासंघला सत्तेपासून रोखण्याकरिता सर्वच पक्षांनी मोठी कस लावली होती. मात्र विरोधकांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले.
भाजपच्या केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र भाजपला या निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. मागील निवडणुकीत 12 जागा मिळवणाऱ्या भाजपला या निवडणुकीत 06 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेने मुसंडी मारत फक्त 1 जागा मिळवली. तर राष्ट्रवादी आणि अपक्षांच्या जागेत वाढ झाली (Akola ZP election result) आहे.
भारिप बहुजन महासंघ सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी गड राखण्यास यश मिळालं आहे.
अकोला जिल्हा परिषद निकाल
जिल्हा परिषद एकूण जागा 53
- भारिप बहुजन महासंघ : 22
- शिवसेना : 12
- भाजप : 07
- राष्ट्रवादी : 03
- काँग्रेस : 05
- अपक्ष : 04