बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, सुशांत सिंह प्रकरणावरही पहिल्यांदाच मत मांडलं

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने ड्रग्सच्या मुद्द्यावर त्याचं मत मांडलं आहे. अक्षयने एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, सुशांत सिंह प्रकरणावरही पहिल्यांदाच मत मांडलं
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 8:33 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये चित्रपटांपेक्षा ड्रग्सबद्दल अधिक चर्चा सुरु आहे. जिथे-जिथे बॉलिवूडचा विषय निघतो, हिंदी चित्रपटांचा विषय निघतो तिथे ड्रग्सचादेखील उल्लेख होऊ लागला आहे. अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री दीपिका पादूकोण , अभिनेत्री श्रद्धा कपूरसारख्या स्टार्सची एनसीबीने (Narcotics Control Bureau) चौकशी केली. याचदरम्यान बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याने ड्रग्सच्या मुद्द्यावर त्याचं मत मांडलं आहे. अक्षयने एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Akshay Kumar breaks silence on Sushant Singh Rajput case and accepts drug problem in Bollywood)

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओसोबत अक्षय कुमारने लिहिलं आहे की, खूप दिवसांपासून मनात एक गोष्ट आली आहे. परंतु मला कळत नव्हतं की काय बोलू, कोणाशी बोलू, आज विचार केला की तुम्हा सर्वांशी ती गोष्ट शेअर करतो.

या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार म्हणतो की, खूप जड अंतःकरणाने मी तुमच्याशी आज बोलतोय. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या मनात एक गोष्ट सारखी येत आहे. परंतु सर्वत्र इतकी नकारात्मकता आहे की, काय, किती आणि कोणाशी बोलू, हे कळत नव्हतं. आम्ही लोक स्टार्स जरी असलो तरी हे बॉलिवूड तुम्ही लोकांनी खूप प्रेमाने बनवलं आहे. आम्ही मिळून केवळ एक इंडस्ट्री नाही.

आम्ही आमच्या चित्रपटांद्वारे देशाची संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मनात काय आहे? तुमच्या भावना काय आहेत? हे आम्ही पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तुम्हाला राग आला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर खूप मुद्दे समोर आले. त्यांनी तुमच्यासह आम्हालाही दुःखी केलं आहे. या सर्व प्रकारानंतर आम्हाला आमच्या आत डोकावणं भाग पडलं आहे. आमच्या इंडस्ट्रीबद्दलच्या अनेक गोष्टींबद्दल विचार करणं आम्हाला भाग पडलं

आजकाल नारकोटिक्स आणि ड्रग्सविषयी चर्चा सुरु आहे. या विषयावर मी खोटं बोलू शकत नाही. ड्रग्सबद्दलच्या अनेक गोष्टी मला मान्य काराव्या लागतील. परंतु मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की, इतर इंडस्ट्रीप्रमाणे आमच्या इंडस्ट्रीतलेही काही लोक त्याच्याशी संबंधित आहेत.

आपले प्रशासन याप्रकरणी जो तपास करतील, याप्रकरणी जे निर्णय घेतले जातील ते योग्यच असतील. मला हेदेखील माहीत आहे की, चित्रपटसृष्टीतील सर्वजण ही गोष्ट मान्य करुन प्रशासनाला सहकार्य करतील. मी फक्त एकच विनंती करतो की, या प्रकरणावरुन पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम नका करु.

मला माध्यमांची ताकद माहीत आहे. मी माध्यमांना एकच विनंती करतो की, त्यांनी त्यांचं काम सुरु ठेवावं. विविध विषयांवर आवाज उठवणं सुरु ठेवावं. परंतु त्यांनी हे असे विषय संवेदनशीलतेने हाताळावे. कारण एक निगेटिव्ह बातमी एखाद्या व्यक्तीच्या कित्येक वर्षांपासूनच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. आम्ही तुमचा विश्वास गमावणार नाही. जर तुम्ही नाराज असाल तर आम्ही अजून मेहनत करु आणि पुन्हा तुमचा विश्वास मिळवू. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. अशीच साथ देत राहा

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा

(Akshay Kumar breaks silence on Sushant Singh Rajput case and accepts drug problem in Bollywood)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.