अक्षय कुमार – गरिबांसाठी, पीडितांसाठी सर्वात अगोदर धावून येणारा खरा हिरो
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात परळीमध्ये सर्वधर्मीय 79 वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी या विवाह सोहळ्यात कन्यादान केलं. दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित […]
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात परळीमध्ये सर्वधर्मीय 79 वधू – वरांचे शुभविवाह मोठ्या थाटात पार पडले. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी या विवाह सोहळ्यात कन्यादान केलं. दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील तोतला मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सकाळी मुस्लीम समाजातील तीन, तर दुपारी बौध्द धर्मातील 20 वधू-वरांचे विवाह त्या-त्या धर्मातील रितीरिवाजानुसार पार पडले. सायंकाळी गोरज मुहूर्तावर उर्वरित विवाह उत्साहात संपन्न झाले. या मुख्य सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार, प्रज्ञा मुंडे, मंत्री महादेव जानकर यांच्यासह खासदार आणि आमदारांची उपस्थिती होती.
अक्षय कुमारची अशीही मदत –
अभिनेता अक्षय कुमार रिल लाईफमधलाच नाही, तर रिअल लाईफमधलाही हिरो आहे हे पुन्हा एकदा त्याने दाखवून दिलं. अक्षय कुमारने बीड जिल्ह्यासोबत अनेक वेळा सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. 2015 मध्ये भीषण दुष्काळ होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. यावेळी अक्षय कुमारने आत्महत्याग्रस्त 30 कुटुंबांना तब्बल पंधरा लाख रुपयांची मदत केली होती.
अक्षयने पुन्हा आज तीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या नव वधू-वरांसाठी अक्षय कुमारने प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. एवढंच नाही तर याआधीसुद्धा अक्षय कुमारने महिलांच्या आरोग्यासाठी महत्वाचे ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनसाठी महिला बालविकास खात्याला 50 लाख रुपयांची मदत केली होती. शिवाय जलशिवार योजनेचे काम पाहून त्यावेळी देखील 30 लाख रुपयांची मदत केली होती.
परळीतील सामुदायिक विवाह सोहळा पाहून अक्षय अक्षरशः भारावून गेला. एवढ्या मोठ्या एकत्र लग्नाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित जनसुदायासमोर मी पहिल्यांदाच आलोय. आपले वैवाहिक जीवन आनंदी व्हावे. सुख-शांती लक्ष्मी यावी असेल असे वाटत असेल तर पत्नी आणि आईची काळजी घ्या. मराठी मला खूप चांगली वाटते. इकडे परळीत सामूहिक लग्नाचा हा कार्यक्रम वर्षातून एकदा नाही तर दोनदा आयोजित करावा, असं आवाहन अक्षय कुमारने यावेळी केलं.
अक्षय कुमार हा केवळ एक रिल लाईफ हिरो नाही तर तो एक रिअल लाईफ हिरो असल्याचं त्याने प्रत्येकवेळी दाखवून दिलं आहे. तो खूप मोठा देशभक्त आहे. तो नेहमीच देशहिताच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. देशाच्या विकासासाठी, भारतीय जवानांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असतो.
14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मदतीचे हात पुढे सरसावले होते. त्यातच अक्षयनेही त्या 40 शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी पाच कोटी रुपयांची मदत केली. इतकंच नाही तर भारताच्या गृह मंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ या वेबसाईटचा प्रचार त्याने केला. लोकांना भारतीय जवानांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. यामुळे भारतीय जवानांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मदत होणे शक्य झाले आहे.
VIDEO :