Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!

खिलाडी कुमारच्या या चित्रपटाच्या शीर्षकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे अनेक संस्थांनी म्हटले होते.

Laxmii | खिलाडी कुमारला ‘बॉयकॉट’चा धसका, अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलले!
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 4:50 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’मुळे (Laxmmi Bomb) चर्चेत आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादांत अडकला होता. चित्रपटाचे प्रमोशन जबरदस्त मार्गाने सुरू होते, पण चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेला वाद काही केल्या शमत नव्हता. या शीर्षकामुळे चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सुरू झाली होती. अखेर हा शीर्षक वाद मिटावा म्हणून या चित्रपटाचे नावच बदलण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ वरून आता केवळ ‘लक्ष्मी’ करण्यात आले आहे.(Akshay Kumar’s Upcoming film Laxmmi Bomb Title change to Laxmii)

खिलाडी कुमारच्या या चित्रपटाच्या शीर्षकामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचे अनेक संस्थांनी म्हटले होते. शिवाय, ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव बदलावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली होती, या नावावर टीका होत असताना अखेर मेकर्सनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला.

राष्ट्रीय हिंदू सेनेचे प्रसारण मंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय हिंदू सेनेने केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘लक्ष्मी बॉम्ब’ बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटाचे नाव बदलले नाही, तर प्रदर्शनाच्या वेळी त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक चित्रपटगृहाबाहेर निषेधात्मक आंदोलन करतील, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला होता. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. ‘हिंदू सेनेने प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीत, ‘लक्ष्मी बॉम्ब’ बनवणाऱ्या निर्मात्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे’, असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले होते.(Akshay Kumar’s Upcoming film Laxmmi Bomb Title change to Laxmii)

‘हे’ होते वादाचे मुख्य कारण

एका विशिष्ठ समुदायाला भडकवण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रेक्षकांच्या मते, लक्ष्मी या नावासमोर बॉम्ब हा शब्द वापरणे अमान्य आहे. आपण ज्या लक्ष्मीची पूजा करतो, तिचा सन्मान करतो, तिच्या नावापुढे बॉम्ब असा शब्द लिहिणे अतिशय निंदनीय आहे. अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे देखील हिंदू सेनेने म्हटले होते. या चित्रपटात एक हिंदू मुलगी आणि मुस्लिम तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. याच मुद्द्याला धरून, हिंदू सेनेने प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचे नाव नाव बदलण्याची मागणी केली होती.

हिंदू जनजागृती समितीकडूनही बंदीची मागणी

चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ हेतूपूर्वक ठेवले गेले आहे. त्यामुळे आमचा पहिला आक्षेप या चित्रपटाच्या नावाला असून यातून कोट्यवधी हिंदूंचे दैवत असलेल्या श्रीलक्ष्मीदेवीची विटंबना केली आहे. एकीकडे हिंदु देवतेचा अपमान करणारे ‘लक्ष्मी फटाके’ बंद करण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे प्रबोधन करत असतांना, या चित्रपटाच्या नावामुळे त्यांना पुन्हा प्रोत्साहनच मिळणार असल्याचे सांगत, या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी  हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली होती.(Akshay Kumar’s Upcoming film Laxmmi Bomb Title change to Laxmii)

‘शक्तिमान’ही नाराज

‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या नावासंदर्भात नाराजी व्यक्त करत, अभिनेते मुकेश खन्ना सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लक्ष्मीसमोर बॉम्ब हा शब्द लिहिणे ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. व्यावसायिक हितसंबंधांचा विचार करून हा खोडकरपणा करण्यात आला आहे. मग त्याला मंजुरी मिळावी का? अर्थात, अजिबात नाही. आपण ‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जिझस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकतो का? नाही ना? मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवता?’, असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.

(Akshay Kumar’s Upcoming film Laxmmi Bomb Title change to Laxmii)

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा धुमाकूळ, 24 तासात 7 कोटी व्ह्यूज

Laxmmi Bomb Trailer | ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा जोरदार धमाका, अक्षय कुमारचा नवा ‘क्वीन’ अंदाज!

श्रीलक्ष्मीचा अपमान, ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन… ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.