आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने नेण्यात येणार आहेत. (Pandharpur Aashadhi Wari update)

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार, हेलिकॉप्टर, विमान किंवा अन्य वाहनाचा पर्याय
Follow us
| Updated on: May 29, 2020 | 5:10 PM

पुणे : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघणाऱ्या पालख्यांबाबत अखेर तोडगा निघाल्याचं चित्र आहे. (Pandharpur Aashadhi Wari update) देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं आहे. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवले जाणार आहे.  (Pandharpur Aashadhi Wari update)

पुण्यात आज अजित पवारांच्या उपस्थितीत वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या.

त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. मानाच्या सात पालखी दशमीला जाईल, पायी वारी जाणार नाही, पादुका विमान हेलिकॉप्टर किंवा विमान यावर निर्णय घेतला जाईल. दशमीला यावर निर्णय होईल.

परंपरेचा सांगड घालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे. सरकार इतर वाहन किंवा विमान उपलब्ध करणार आहे. पालखी बरोबर कमीत कमी वारकरी असतील. पादुकांचं प्रस्थान अष्टमीला होईल, दशमीला पंढरपूरला जाईल.

वारकरी संप्रदायाची परंपरा असणाऱ्या ऐतिहासिक अशा श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, कसे करायच्या यावरुन वारकरी आणि प्रशासन यांच्यासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर आता तोडगा निघाला आहे.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे चारवेळा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे जून महिन्यातील कोरोनाची राज्यातील स्थिती पाहून आळंदी पालखी सोहळ्यावर (Alandi Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi) निर्णय घेण्यात येईल असं यापूर्वी सांगण्यात येत होतं. आता त्यावर वारकरी आणि प्रशासनाचं एकमत झालं आहे,.

(Pandharpur Aashadhi Wari update)

संबंधित बातम्या  

Pandharpur Wari | माऊलींच्या पालखीची परंपरा अखंडित ठेवण्याचा निर्धार, नियमांचे काटेकोर पालन करणार

देहू, आळंदी पालखी सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.